या खेळाडूला डेट करत आहे तापसी पन्नू, जाणून घ्या तिची लग्नाबाबत ची स्वप्ने काय आहेत !

बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री मध्ये कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच होत असतात. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत एक मोठी बातमी हाती लागली आहे. ते म्हणजे तापसी पन्नू सध्या एका खेळाडूच्या प्रेमात पडली आहे.
तसे पाहायला गेले तर बॉलीवूड सेलिब्रिटी नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्य बाबत आणि अफेअर बद्दलच्या बातम्या प्रेक्षकांत पासून लपवतात मात्र तापसी पन्नू स्वतः या गोष्टीचा खुलासा केला की ती बॅडमिंटनपटू माथियास बो ला डेट करीत आहे. या गोष्टीचा खुलासा खुद्द तिने केला. तिने स्वच्छंदपणे त्यांच्या या नात्याला स्वीकारले आहे.
काही सेलिब्रिटी मात्र अशा गोष्टी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. तापसी पन्नू तिच्या या नात्याला लोकांपासून लपवून ठेवू इच्छित नाही. एवढेच नव्हे तर तापसीच्या कुटुंबाला देखील त्यांच्या या नात्या बद्दल संपूर्ण माहिती आहे. तापसी ला तिच्या लग्नाबद्दल विचारले असता तिने सांगितले कि ती तिचे लग्न धामधुमीत करू इच्छित नाही. तिला शांततापूर्ण लग्न करायचे आहे. त्याशिवाय तिचे लग्न हे चार दिवसांच्या मोठमोठ्या विधींमध्ये न होता एकाच दिवसात व्हावे अशी तिची इच्छा आहे. तापसी म्हणते की मी माझे लग्न फक्त आमच्या परिवाराच्या उपस्थितीतच करू इच्छिते. तर तापसी ची आई निर्मलजीत कौर यांनी सांगितले की त्यांचा तापसी वर लग्न करण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. तिचे लग्न है संपूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहे तिला ज्यावेळेस वाटेल त्यावेळी ती लग्न करू शकते.
तापसी च्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती येणाऱ्या दिवसात हसीना दिलरूबा आणि लूप लपेटा या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तापसी ने याआधी हिंदी, तेलगू, आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तापसी ने २०१० मध्ये तेलुगु चित्रपटातून तिच्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर चष्मे बहाद्दर या विनोदी चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
त्यानंतर ती थ्रिलर पिंक, बदला, मिशन मंगल, जुडवा २, द गाझी अटॅक या चित्रपटांमध्ये दिसली होती. तिथे हे सर्व चित्रपट चांगले गाजले. तिच्या सांड की आंख या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here