केरळमध्ये हत्तींनीसोबत हे काही घडलं ते वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही !

२०२० हे वर्ष काहीसे भयानकच आहे असे म्हणायला काही हरकत नाही. कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत नाही तोपर्यंत निसर्ग वादळाची चाहूल लागली. त्यानंतर ही घटना शिळी होत नाही तोवर अजुन एक मानवी कृत्य समोर आले आहे आणि यात निष्पाप बळी गेला तो म्हणजे एका गर्भवती हत्तीणीचा ! सध्या एका हत्तींनी चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. ही हत्तीण नदीमध्ये यातना सहन करत उभी होती. मात्र त्या असहाय्य वेदना सहन न झाल्यामुळे ती हत्तीण मृत पावली आणि तिच्या सोबतच तिचे जन्माला न आलेले मुल सुद्धा जगात पाऊल ठेवायच्या आधीच मरण पावले. या हत्येच्या मृत्यू सोबतच माणुसकी सुद्धा मेली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण त्या हत्तीणीने माणसांवर विश्वास ठेवला हीच तिची मोठी चूक झाली.
ही घटना घडली भारतातील केरळ राज्यांमधील मन्नारकड येथे. एक हत्तीण अन्नाच्या शोधात त्या गावात गेली होती त्यावेळी येथील काही व्यक्तींनी या हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घातले. ते खाल्ल्यावर त्या अननस आतील फटाके तिच्या तोंडात फुटले. यामुळे त्या हत्तीणीचा संपूर्ण जबडा फाटला तसेच तिच्या सोंडेत दुखापत होऊन तिचे दात देखील तुटले. या वेदना सहन न झाल्यामुळे ती हत्तीण निपचित पणे त्या माणसांना काहीही न करता वेलीयार नदीत जाऊन उभी राहिली. कदाचित पाण्याच्या गारव्यामुळे तिला थोडासे बरे वाटत असावे यासाठी ती नदीत गेली असावी.
सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क मधील वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनाही हत्तीण २५ मे रोजी जंगलात फिरताना दिसली होती. कदाचित यावेळी ती तिच्या गर्भातील बाळासाठी अन्न शोधत होती. रॅपिड रेस्पोन्स टीमचे वन्य अधिकारी मोहन कृष्णन यांनी सोशल मीडिया वर  भाऊक पोस्ट लिहिल्यावर ही घटना जगासमोर आली. त्यांनी लिहिले की जखमी झाल्यावर ती हत्तीण एका गावात धावत गेली मात्र त्यावेळी तिने कोणालाही इजा केली नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमधून तिची वेदना आपल्याला समजू शकत नाही मात्र त्यावेळी ती मरणाच्या दारात उभी होती. तसेच इतर वन अधिकाऱ्यांनी सांगितले की तिला इतर हत्तींच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तिच्यामधील ताकद संपलेली.

वनविभाग पशुचिकित्सक अधिकारी हत्ती चे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु २७ मे ला त्या हत्तीणीने नदीत उभ्या उभ्याच प्राण सोडला. त्यानंतर तिला पाण्याच्या बाहेर काढले गेले आणि तिच्या शरीराचे पोस्टमार्टम केले गेले. त्यावेळी असे लक्षात आले की ती हत्तीण गर्भवती होती. कृष्णन यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले होते की पोस्टमॉर्टम झाल्यावर डॉक्टर आणि आम्हाला फक्त एवढेच सांगितले की ती एकटीच नव्हती ! त्यावेळी जरी डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मास्क असला तरीही त्यांच्या चेहर्‍यावरील दुःख आम्ही समजू शकत होतो. त्यानंतर हत्तीणीची चिता जाळून तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
या हत्तींणीच्या मृत्यू पाठी ज्या व्यक्तींचा हात आहे त्यांच्यावर वन्यजीवन संरक्षण कायद्याअंतर्गत एफ आय आर दाखल केली गेली आहे. तसेच त्या माणसांचा शोध चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here