‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील मुख्य अभिनेत्रीचा जीवनप्रवास वाचून थक्क व्हाल !

माणूस ज्या परिस्थितीत जन्माला येतो तीच स्थिती पुढे भविष्यातही मरणापर्यंत तशीच राहील असे काही गरजेचे नसते. जर त्या व्यक्तीत आयुष्यात सफल होण्याची इच्छा असेल, स्फूर्ती असेल तर त्या व्यक्तीला कोणीच अडवू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे जगभरात आहेत. परंतु असेही काही लोक असतात जे त्याच परिस्थितीत जगतात कारण त्यांची इच्छाशक्ती जास्त नसते.
मात्र टीव्ही इंडस्ट्री मधील एक मुलगी या सर्व गोष्टीला अपवाद आहे. गरीब परिवारात जन्मलेली ही अभिनेत्री अशाप्रकारे करोडपती वल्ली की आज टीव्हीवर एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखले जाते तिने स्वतःच्या नावासोबत भरपूर पैसा देखील कमावला. असे बरेच लोक आहेत ज्यांचे अभिनय करणे हे एक स्वप्न आहे. यासाठी लोक खूप मेहनत सुद्धा करतात .यात काही सफल होतात तर काही असफल. या सफल लोकांपैकीच एक आहे ती म्हणजे अभिनेत्री शिवांगी जोशी.
ही तीच अभिनेत्री आहे जिने प्रसिद्ध मालिका ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये लीड ॲक्ट्रेस म्हणून काम केले होते. शिवांगी तिच्या करिअरची सुरुवात बेइंतहा या मालिकेतून सहाय्यक अभिनेत्री म्हणून केली होती. त्यानंतर शिवांगीला बेगूसराय या मालिकेत प्रमुख अभिनेत्री म्हणून पाहिले गेले. या दिवसात ती टीव्हीवरील बहुचर्चित मालिका ये रिश्ता क्या कहलाता है या मध्ये प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. शिवांगी जोशी एका गरीब परिवारात जन्मली होती.
गरीबी दूर करण्यासाठी शिवांगी नेहमी काहीतरी वेगळा विचार करायची. त्यावेळी शिवांगी च्या मनात अचानक अभिनय करण्याचा विचार आला आणि ती घर सोडून मुंबईला पळून आली. मुंबईला आल्यावर काही दिवसांच्या संघर्षानंतर तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. मुंबईत आल्यावर शिवांगीला तिच्या स्वप्नांना भरारी देण्याची खरी दिशा मिळाली आणि आतापर्यंत तिने 22 करोड रुपये कमावले आहेत.
आता ती मुंबईसारख्या शहरात स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहते आणि दर महिना लाखो रुपये कमवते. शिवांगी ची आई व भाऊ हेदेखील मुंबई तिच्या सोबत राहतात. काही दिवसांपूर्वीच शिवांगी ने ६० लाख रुपये किंमतीची एक कार खरेदी केली जिचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केले आहेत.
शिवांगी जोशी ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गोल्ड अवॉर्ड मिळवला. तिच्या अभिनयाप्रमाणेच दिसायला देखील खूप सुंदर असून सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here