सागरिका सोबत लग्न करण्यासाठी, जहीर खानला घालण्यात आल्या होत्या या अटी !

बॉलिवुड दुनियेत असे अनेक कलाकार असतात जे सुरुवातीला खूप नावं कमवतात आणि नंतर अचानक गायब होतात. याच यादीत सागरिका चे नाव सुद्धा सहभागी आहे. काही काळापूर्वी सागरिका ही एक टॉप च्या अभिनेत्रींपैकी एक होती. सागरिकाने शाहरुख सोबत चक दे इंडिया मध्ये काम केले होते. या चित्रपटानंतर ती रातोरात स्टार बनली आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री झाली. मात्र काही काळानंतर तिने बॉलीवूडला राम राम ठोकले. आज आम्ही तुम्हाला तिच्या बद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.
बॉलिवुड अभिनेत्री सागरिका घाटगे ने दोन वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू जहीर खान सोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाची एक मजेदार गोष्ट आता समोर आली आहे. ती म्हणजे सागरीकाला पसंत करण्यापूर्वी जहीर खान च्या कुटुंबाने तिचा चित्रपट पाहण्याची डिमांड केली होती. आणि त्यानंतरच लग्न फिक्स झाले. जहीर खान आणि सागरिका घाटगे खूप काळापासून एकमेकांना पसंत करत होते. परंतु ते योग्य वेळेची वाट पाहत होते. त्यानंतर या दोघांनी दोन वर्षांपूर्वी लग्न केले आणि आता ते सुखी सहजीवन जगत आहेत.
एका मीडिया रिपोर्ट ने दिलेल्या अहवालानुसार जहीर खानच्या कुटुंबाने सागरिका ला पसंत करण्यापूर्वी तिचा चित्रपट पाहण्याची अट घातली होती. यासाठी त्यांनी सागरिका ने काम केलेल्या चक दे इंडिया या चित्रपटाची सिडी मागवून घेतली. त्यानंतरच त्यांनी हे नाते मान्य केले. याचाच अर्थ सागरिकाचा चित्रपटातील अभिनय पाहून तिला जाहीर साठी पसंत केले गेले. आणि त्यानंतरच दोघांनी लग्न केले. चक दे इंडिया हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता. आजही या चित्रपटातील गाणी लोकांच्या तोंड पाठ आहेत.
केवळ जहीर च्या नव्हे तर सागरिका च्या कुटुंबाने सुद्धा लग्नासाठी अट ठेवली आहे. जहीर साठी सुद्धा सागरिका सोबत लग्न कण्यापूर्वी खूप अडचणींना सामोरे जावे लागले होते. कारण सागरिका च्या कुटुंबाला जहीर पसंत नव्हता. सुरवातीला सागरिकाच्या कुटुंबाने जहिरला नापसंती दर्शवली होती.
सागरिका ने कसे तरी करून तिच्या कुटुंबाला लग्नासाठी राजी केले आणि मग दोघांचे लग्न झाले. जहीर सोबत लग्न झाल्यानंतर सागरिका चित्रपट सृष्टी पासून दूर झाली. हे दोघे मीडिया पासून सुद्धा दूर राहणे पसंत करतात. सर्वात शेवटी त्यांना युवराज सिंह च्या पार्टी मध्ये बघितले गेले होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here