पाणीपुरी चाहत्यांनो जाणून घेऊया पाणीपुरीचे फायदे !

पाणीपुरी कोणाला आवडत नाही; प्रत्येकजण पाणीपुरी खातो. पाणीपुरीचं नाव जरी काढलं तरी पटकन आपल्या तोंडाला पाणी सुटतं. पण जास्त पाणीपुरी खाल्ल्याने त्रास होतो, जास्त पाणीपुरी खाऊ नये, असं आपण नेहमी ऐकतो. परंतु तुम्हाला माहित आहे का? पाणीपुरी चविष्ट तर असतेच पण शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील पाणीपुरीचा फायदा होतो. जाणून घेऊयात पाणीपुरीचे इतर फायदे.
अनेकदा पाणीपुरीच्या पाण्यामध्ये जिरे, काळे मीठ, काळ्या मिरचीची पावडर यांचे मिश्रण असते. या मिश्रणामुळे पाणीपुरीच्या पाण्याला चव तर येतेच पण सोबतच त्याच्या पचनासाठी देखील हे पाणी उपयोगी ठरते. यामुळे या ॲसिडिटीपासून सुद्धा सुटका मिळते. कोणताही पदार्थ खाताना आपण आपल्या वजनाचा पहिला विचार करतो. हा पदार्थ खाल्ल्याने आपले वजन वाढेल का?, किती प्रमाणात खाल्ले पाहिजे हा सगळा विचार तर आपसूकच मनात येतो. तर मग पाणीपुरी आपण बिनधास्त खाऊ शकतो. पाणीपुरी खाल्ल्याने वजन देखील कमी होऊ शकते.
पाणीपुरी हे गोड, तिखट, आंबट अशी अगदी चविष्ट असते. उष्णतेमुळे आपल्या तोंडामध्ये उष्णतेने पांढऱ्या पुळ्या येतात आणि त्यामुळे आपण तिखट खाऊ शकत नाही. पण पाणीपुरीमुळे आपण या पांढऱ्या पुळ्यांपासून दूर राहू शकतो. पाणीपुरीतील तिखटपणा पोट देखील साफ ठेवते आणि त्या त्या पांढऱ्या पुळ्यांमधील पाणी सुकवते. उन्हाळ्यामध्ये जेव्हा घसा सारखा कोरडा होतो तेव्हा पिठाच्या बनलेल्या पाणीपुरी खाव्यात. त्यामुळे आराम ही मिळतो आणि पाणीपुरीचे पाणी पियाल्याने अगदी फ्रेश वाटते.
पाणीपुरी खाण्यासाठी दुपारची वेळ अगदी योग्य असते. कारण दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता यामध्ये पाणीपुरी खाल्ल्याने पचनक्रियेसाठी लाभदायक ठरते. संध्याकाळचा वेळेस पाणीपुरी खाल्ल्याने वजन वाढते. जे वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांनी संध्याकाळचा वेळेस पाणीपुरी खावी. जे लोक व्यायाम करतात त्यांनी व्यायामाचा आधी वा नंतर पाणीपुरी कदापि खाऊ नये. दुपारच्या वेळेस 5-6 पिठाच्या पाणीपुरी नक्कीचं खाऊ शकता. पाणीपुरी मध्ये मूग आणि चणे या गोष्टींचा समावेश केल्यास ते अधिक फायदेशीर ठरतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here