या अभिनेत्यांना त्यांच्या वडिलांप्रमाणे यश मिळवता आले नाही !

फिल्म इंडस्ट्री वर नेहमीच भाऊबंदकीचा आरोप लागत आला आहे. पण जेव्हा तुम्ही या प्रकरणाची दुसरी बाजू बघता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की येथे ओळखीने चित्रपटांमध्ये काम तर मिळून जाते परंतु हवी तशी सफलता मिळत नाही. असे अनेक स्टार किड्स आहेत ज्यांच्या आईवडिलांनी चित्रपटांमध्ये खूप नाव कमावले आहे मात्र त्यांची मुले चित्रपट सृष्टीत नाव कमावू शकले नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच स्टार किड्स बद्दल सांगणार आहोत ज्यांचे चित्रपट सृष्टीत काम करण्यासाठी लागणारे नशीब खोटे ठरले.
आर्य बब्बर
सर्वप्रथम जाणून घेऊया राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर बद्दल. आर्यचा जन्म २४ हे १९८१ ला झाला. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात २००२ मध्ये आलेल्या अब के बरस या चित्रपटामधून केली होती. यानंतर आर्य ने गुरु, जेल, तीस मार खां, डेंजरस इश्क, जोकर, बंगिस्तान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र त्याला हवी तशी सफलता मिळाली नाही. आर्य बब्बर ने बिग बॉस सीजन ८ मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग सुद्धा घेतला होता.

अध्ययन सुमन
या यादीत दुसरे नाव आहे शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन. अध्ययन सुद्धा चित्रपटांच्या बाबतीत फ्लॉप ठरला. त्याने २००८ मध्ये आलेल्या हाल ए दील या चित्रपटांमधून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. पण त्यानंतर लवकरच तो फिल्म इंडस्ट्री मधून काहीसा गायब झाला. अध्ययन कंगना राणावत सोबतचा अफेअर मुळे चर्चेत होता. सध्या अध्ययन युट्युब वर व्हिडिओ बनवत असतो.

लकी अली
कॉमेडी किंग महमूद यांचा मुलगा लकी अली खूप काळापासून लाईम लाईट पासून दूर आहे. गायक आणि संगीतकार असलेल्या लकी अली ला त्याच्या वडिलांसारखी सफलता मिळवता आली नाही. कहो ना प्यार है या चित्रपटांमधील लकी चे ना तुम जानो ना हम हे गाणे खूप पॉप्युलर झाले होते. या गाण्यासाठी त्याला बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर चा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. लकी चे अनेक अल्बम बाजारात आले आहेत.

अरमान कोहली
दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा मुलगा अरमान कोहली हा देखील त्याच्या वडिलांनी इतके इंडस्ट्रीमध्ये नाव कमावू शकला नाही. अरमाने बदले की आग या चित्रपटांमधून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याच्या वडिलांच्या चित्रपट विरोधी मध्ये त्याने मुख्य अभिनेत्याचे पात्र साकारले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यानंतर त्याने दुश्मन जमाना, कोहरा, अवलाद का दुश्मन या चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांपेक्षा अरमान त्याच्या रागीट स्वभावा मुळे चर्चेत राहिला. बिग बॉस सीजन ७ मध्ये तनिषा मुखर्जी सोबतच्या मुळे तो पुन्हा चर्चेत आला होता.

जैकी भगनानी
चित्रपट निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा जैकी भगनानी सुद्धा बॉलीवूड मध्ये हवे तसे नाव कमावू शकला नाहीत. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या कल किसने देखा या चित्रपटांमधून त्यांनी त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. याआधी रहना है तेरे दिल में या चित्रपटामध्ये त्याचा छोटासा रोल होता. अभिनयात फ्लॉप ठरल्यावर जैकी निर्माता बनला. त्यांनी सरबजीत, दिल जंगली, जवानी जानेमन यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. पुढील काही दिवसात‌ त्यांचा कुली नंबर १ हा चित्रपट प्रदर्शित होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here