दबंग या चित्रपटातून सिनेसृष्टीत सोनाक्षीने पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत सोनाक्षीने आपल्या करियरकडे यशस्वी वाटचाल कायम ठेवली आहे. 2 जूनला सोनाक्षी सिन्हा आपला वाढदिवस साजरा करते. सोनाक्षी आता 33 वर्षांची झाली आहे.
चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी तिला फिट होणे हा खूप महत्तवाचा टास्क तिच्यासाठी होता. करण चित्रपटांमध्ये येण्याआधी सोनाक्षी फार लठ्ठ होती. सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लहानपणीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लहानपणी सोनाक्षी अगदी गोंडस होती. तिचे बाबा शत्रुघ्न सिन्हा आई पूनम सिन्हा, दोन भाऊ लव कुश आणि ती असा त्यांचं एकंदर परिवार आहे. असं पूर्ण कुटुंब असलेला फोटो सोनाक्षीने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. सोनाक्षी तिच्या बाबांची फार लाडकी आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या अनेक कार्यक्रमांना ती त्यांच्या सोबत जात असे. शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी मध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे.
चित्रपटांमध्ये काम करण्याआधी सोनाक्षीचे वजन तब्बल 96 किलो होते. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सोनाक्षीने फार मेहनत करून वजन कमी केले. तिच्या वजनामुळे अनेकदा तिला सोशल मिडियावर ट्रोल देखील केले जातं. पण त्यांना गप्प करण्यात सोनाक्षी नेहमीच तयार असते. सोनाक्षीच्या मते ती जशी आहे तशी खुश आहे.
एखाद्या व्यक्तीला त्याचा दिसण्यावरून बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे. लोक काय म्हणतात याचा विचार सोनाक्षी पूर्वी करत असे. पण आता ती लोक काय म्हणतात यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. तिला आनंद मिळणाऱ्या गोष्टींकडे ती जास्त लक्ष केंद्रित करते.