फक्त ३ सेकंदात होऊ शकतो चित्रपट डाउनलोड!

you can download movie in 3 secs with infrared wifi

फक्त तीन सेंकदात पूर्ण चित्रपट डाउनलोड करु शकता असं कोणी सांगितलं तर… यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. डच संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे एक नवीन वायरलेस नेटवर्कच्या मदतीने वायफायचा स्पीड ३०० पट अधिक वाढवता येऊ शकतो. इन्फ्रारेड रेंजचा वापर या नेटवर्कमध्ये करता येऊ शकतो.माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रकाश किरणांचा वापर वायरलेस पद्धतीने करण्याचा प्रयत्न आहे. यातील प्रत्येक किरण हाय कॅपेसिटी चॅनेलवर काम करतो. प्रत्येक काम हे ऑप्टीकल फायबर प्रमाणे होतं. पण यासाठी फायबरची गरज नाही. यावेळी आम्ही सेकंदाला ११२ जीबीपर्यंत डाटा ट्रान्सफर करु शकतो.असे अॅडहोवेन तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रोफेसर टॅान कूनन यांनी सांगितलं.

तीन एचडी चित्रपटा इतका डाटा अवघ्या १ सेंकदात डाउनलोड करता येऊ शकतो. लाइट अॅन्टीना वेगवेगळ्या अॅगल्सने अदृष्य वेवलेंथ रेडीएट करते. एखादा स्मार्टफोन किंवा टॅबलेट एका अॅन्टीनाच्या साइटलाइनपासून लांब गेला तर तो दुसऱ्या अॅन्टीनाच्या साइटलाइनला जोडला जातो. यामुळे नेटवर्कचा पुरवठा खंडीत होत नाही. या नेटवर्कची एक चांगली गोष्ट म्हणजे इन्फ्रारेड वेवलेंथमुळे डोळ्यांना कुठलीही इजा होत नाही. तसेच या तंत्राच्या देखभालीची चिंता करण्याचीही गरज नाही. प्रत्येक युजर्ससाठी एक स्वतंत्र अॅन्टीना असेल.

कूनन यांच्या म्हणण्याप्रमाणे या तंत्राचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे वापर करताना काही शेअर करण्यासाठी एक ‘बीम’ पर्यंतची उर्जा मिळणार आहे. यामुळे पॅावरचा वापर कमी प्रमाणात होईल. दुसरा फायदा म्हणजे याची प्रकाश किरणे भिंतीतून आरपार जाऊ शकत नाही. यामुळे तुम्ही ज्या खोलीत आहात त्याखोली पर्यंतच तुमच्या क्रीया मर्यादीत राहतील. पुढच्या ५ वर्षापर्यंत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे.

Loading...

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here