अभिनेत्री काजल अगरवाल आहे या क्रिकेटरची खूप मोठी फॅन !

टीम इंडिया मध्ये असे अनेक बल्लेबाज आहेत ज्यांनी त्यांच्या बॅटिंग ने अनेक क्रिकेप्रेमींचे मन जिंकून घेतले आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका क्रिकेटर बद्दल सांगणार आहोत ज्याने त्याच्या बॅटिंग ने अनेक युवतींना त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडले. तो क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे रोहित शर्मा.
रोहित शर्माचा नुकताच ३३ वा वाढदिवस झाला. त्याचा जन्म ३० एप्रिल १९८७ ला नागपूर येथे झाला. त्याच्या अफलातून बॅटिंग मुळे त्याने त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड ची नोंद केली आहे. त्याच्या अशा वेगळ्याच शैली मुळे बॉलिवुडची सुंदर अभिनेत्री काजल अग्रवाल त्याची दिवाणी झाली आहे.
रोहित शर्माच्या हा त्याच्या फलंदाजी साठी खूप प्रसिद्ध आहे. त्याने वनडे मालिकेत ३ वेळा द्विशतके केली आहेत. तो आयपएलमध्ये मुंबई इंडियन्स चा कॅप्टन सुद्धा आहे. आपल्या संघाला सर्वाधिक वेळा जिंकवून देणारा तो एकमेव कॅप्टन आहे.
जेव्हा एका मुलाखतीत काजल अग्रवाल ला विचारले गेले की तिचा आवडता बॅट्समन कोण तर तिने रोहित शर्मा असे उत्तर दिले. काजल अग्रवालला रोहितची फलंदाजी खूप आवडतं त्यामुळेच ती त्याची खूप मोठा चाहती आहे.
काजल अग्रवाल ने बॉलिवुड तसेच हिंदी चित्रपटांत काम केले आहे. क्यू हो गया ना ! या हिंदी चित्रपटामधून काजोल ने चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते.
या चित्रपटात तिने ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि विवेक ओबरॉय सोबत काम केले होते. हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता त्यांनतर तिने तेलगू चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. याशिवाय तिने सिंघम, स्पेशल २६, दो लफजो की बात या हिंदी चित्रपटांत काम केले होते. २०१३ मध्ये तिला दक्षिणेकडील युथ आयकॉन या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here