बॉलीवूड आणि क्रिकेटचे नाते तसेच पहायला गेले तर फार जुने आहे. नवाब पतोडी आणि शर्मिला टागोर, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारखी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आता याच यादीत अजून एक नाव सहभागी होऊ शकते. असे म्हटले जाते की टीम इंडियाचा सुपरफास्ट बॉलर जसप्रीत बुमराह हा अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ला डेट करीत आहे. अनुपम आहे साउथ इंडस्ट्रीमध्ये काम करते. असे म्हटले जाते की सध्या ही दोघं एकमेकांची खूप गप्पा मारत असतात. तसेच जसप्रीत बुमराह आणि अनुपमा एकमेकाला सोशल मीडियावर सुद्धा फॉलो करतात. बुमराहने अनुपमा चा अनेक ट्विट्स आणि फोटोंना लाईक केले आहे. काही दिवसांपूर्वीच अनुपमाला एका प्रेस कॉन्फरन्समध्ये तिच्या आणि बुमराह च्या अफेअर बद्दल प्रश्न विचारले होते मात्र तिने असे काहीच नसल्याचे सांगून आम्ही चांगले मित्र आहोत असे स्पष्टीकरण दिले.
अभिनेत्री अनुपमा ही आता २३ वर्षांची असून तिने साउथ फिल्म इंडस्ट्री मध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रेमम या चित्रपटामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. अनुपामाने तिचे महाविद्यालयीन शिक्षण केरला मधून पूर्ण केले. यासोबतच अनुपमाने सतामनम भवति, नटसर्वभुमा आणि वनधि ओकादे यांसारखे अनेक चित्रपट केले आहे. तिने तिच्या अभिनयामुळे तीन मोठे पुरस्कार सुद्धा जिंकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार स्टार क्रिकेटर बुमराह सध्या सोशल मीडियावरील अनुपमा च्या पोस्टला खूप रिऍक्ट करत असतो.
याआधी बुमराह चे नाव अभिनेत्री राशी खन्ना सोबत जोडले गेले होते मात्र तेव्हाही हे दोघं एकमेकांचे फक्त चांगले मित्र होते. राशी खन्ना बॉलीवुड मधील मद्रास कॅफे या चित्रपटात जॉन अब्राहम सोबत दिसली होती. बुमराह बद्दल बोलायचे झाल्यास त्याचा जन्म ६ डिसेंबर १९९३ ला झाला. बुमराह आयपीएल मधून मुंबई इंडियन्स टीम साठी खेळतो. बुमराहने त्याच्या क्रिकेटमधील करिअरची सुरुवात T20i करण्याची मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यातून २०१६ मध्ये केली होती.