पहिल्याच चित्रपटात स्टार बनलेला अभिनेता फरदिन खान सध्या काय करतो जाणून घ्या !

बॉलिवूड दुनिया बाहेरून जितकी चमचमती दिसते प्रत्यक्षात ती तितकी नाही . येथे हिट चित्रपट देणारा एखादा स्टार जर अचानक मोठ्या पडद्यापासून दूर झाला तर दुनिया त्याला विसरू लागते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी त्यांच्या लूक मुळे आणि त्यांनी केलेल्या हिट चित्रपटांमुळे प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. पण त्यातील काही कलाकार काही कारणास्तव मोठ्या पडद्यापासून दूर झाले आहेत. सध्या असेच काहीसे हाल अभिनेता फर्दिन खानचे झाले आहे.
काही वर्षांपूर्वी फरदीन खान ने बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट केले होते. मात्र आता तो लाईमलाईट पासून दूर झाला. फरदीन खान हा फिरोज खान यांचा मुलगा आहे पण स्टार कीड असून देखील या गोष्टीचा फायदा त्याला करिअरमध्ये झाला नाही. फरदीन खान ला त्याच्या वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण करता आली नाही.
आज आम्ही या पोस्ट मधून तुम्हाला फरदीन खान सध्या कोठे आहे आणि काय करत आहे हे सांगणार आहोत.
फरदीन खानने त्याच्या करिअरची सुरुवात प्रेम अगन या चित्रपटापासून केली होती. त्याकाळी हा चित्रपट हिट झाला होता. या चित्रपटासाठी फरदीन ला बेस्ट डेब्यू म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला. त्यानंतर फरदीन ने एकाहून एक हिट चित्रपट केले. या चित्रपटांमध्ये नो एन्ट्री, हे बेबी, जंगल, ओम जय जगदीश, फिदा यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय फरदिनने खुशी और लव के लिये कुछ भी करेगा यांसारखे चित्रपट सुद्धा केले जे बॉक्स ऑफिसवर फारसे चालू शकले नाहीत.
फरदीन ची इमेज सर्वांसमोर चॉकलेट बॉय म्हणून होती. प्रेक्षक फरदीन ला खूप पसंत सुद्धा करायचे. हे बेबी हा चित्रपट त्याच्या करिअरमधील शेवटचा हिट चित्रपट ठरला. यानंतर फरदीनने जय वीरू, लाइफ पार्टनर, डार्लिंग, ऍसिड फॅक्टरी, दुल्हा मिल गया यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र मोठ्या पडद्यावर हवे तसे यश मिळवता आले नाही. एवढ्या साऱ्या फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्याला काम मिळणे बंद होत गेले. फरदीन हळूहळू चित्रपट दुनियेपासून दूर होत गेला. काही काळानंतर त्याचे असे काही फोटो समोर आले की त्याच्याकडे बघून सगळे आश्चर्य व्यक्त करू लागले.
कधीकाळी खूप क्युट आणि हँडसम दिसणारा हा अभिनेता त्या फोटोमध्ये  वाढलेल्या वजनामध्ये दिसत होता. सध्या फरदीन चे वजन इतके वाढले की प्रेक्षकांना त्याला ओळखणे मुश्किल होऊन जाते. काही काळापूर्वी फरदीनला त्याच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल देखील केले होते. या सर्व गोष्टींवर जेव्हा फरदीन ला विचारले त्यावेळी त्याने सांगितले की या सर्व गोष्टीचा मला काही फरक पडत नाही. लोकांनी त्यांचे विचार बदलले पाहिजेत. मी जसा आहे तो आहेच. मी स्वतःला रोज आरशात न्याहाळू शकतो.
फरदीन ने २००५ मध्ये अभिनेत्री नताशा माधवानी सोबत लग्न केले होते. नताशा ही प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांची मुलगी आहे. फरदीन स्वतः आता दोन मुलांचा पिता आहे. सध्या नताशा आणि फरदीन त्यांच्या मुलांसोबत लंडनमध्येच वास्तव्यास आहेत.
असे म्हटले जाते की फरदीन नो एन्ट्री या चित्रपटाच्या सिक्वेल मधून कमबॅक करू शकतो. असे झाल्यास त्याचे चाहते त्याला पुन्हा एकदा नव्या रुपात मोठ्या पडद्यावर पाहू शकतात ‌.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here