या कारणामुळे ‘राकेश रोशन’ डोक्यावर ठेवतात कायम टक्कल !

तुम्ही सर्वांनी हल्ली एक सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ नक्की बघितला असेल ज्यात एक व्यक्ती गोविंदाच्या चित्रपटातील मय से मीना से या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसला होता. त्यानंतर ती व्यक्ती त्या एका व्हिडिओ मुळे रातोरात प्रसिद्धी झाली. गोविंदा वर चित्रित झालेले ते गाणे १९८७ मध्ये आलेल्या खुदगर्ज या चित्रपटातील होते.
आता या चित्रपटाला ३१ वर्ष पूर्ण झाली आहेतं. जसे त्या व्यक्तीचे नशीब या चित्रपटातील गाण्याच्या व्हिडिओ मुळे बदलले तसेच अजुन एक व्यक्ती आहे ज्यांचे नशीब या चित्रपटाने पालटले आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन बॉलिवुड मधील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक असणारे राकेश रोशन आहेत. आपण सर्वच जण खूप काळापासून राकेश रोशन यांना बिना केसांचे पाहत आलो आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का त्यांना डोक्यावर टक्कल ठेवणे का आवडते. किंवा ते कायम टक्कलच का ठेवतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच थोडी माहिती देणार आहोत.
आपल्या सर्वांना ठाऊक आहे की राकेश रोशन यांची जादू मोठ्या पडद्यावर फारशी चालू शकली नाही. परंतु असे असून देखील त्यांनी हिंमत सोडली नाही. आपल्या परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी ते चित्रपटांमध्ये छोटे-छोटे रोल करायचे मात्र तरीही त्यांचे करिअर संपल्यातच जमा झाले होते. जेव्हा त्यांना जाणवले की त्यांचे करीयर अभिनय क्षेत्रात खाली जात आहे तेव्हा मात्र त्यांनी निर्मिती क्षेत्राकडे वळण्याचे ठरवले व त्यासाठी त्यांनी खटपट करण्यास सुरुवात केली. पण तेथेही नशिबाने साथ दिली नाही. १९८६ मध्ये त्यांनी भगवान दादा हा चित्रपट निर्मित केला. पण तो बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.
हा चित्रपट फ्लॉप झाल्याने त्यांचे करीयर पूर्णपणे बरबाद झाले होते. एवढे होऊन सुद्धा त्यांनी हार मानली नाही. ते प्रयत्न करत राहिले. फ्लॉप अभिनेता आणि निर्माता अशी ओळख घेऊन त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाकडे वळण्याचे ठरवले. पण हे काम त्यांच्यासाठी इतके सोपे नव्हते. कारण त्यांच्या करीयर मध्ये त्यांनी अशी कोणतीच मोठी गोष्ट केली नव्हती. परंतु अशात सुद्धा एक चित्रपट दिग्दर्शित करणे मोठी गोष्ट आहे.
राकेश रोशन यांनी अपार मेहनत घेतली आणि मल्टी स्टार चित्रपट खुदगर्ज दिग्दर्शित केला.हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट. या चित्रपटात जितेंद्र, गोविंदा, आणि निलम यांसारख्या अनेक मोठे कलाकार होते. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी राकेश रोशन यांनी तिरुपतीला जाऊन नवस केला. त्यांनी नवस मागितला की जर माझा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला तर की आजन्म डोक्यावर टक्कल ठेवीन. त्यानंतर ३१ जुलै १९८७ ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. त्यांनी तिरुपतीकडे मागितलेली इच्छा पूर्ण झाली होती. येथूनच पुढे त्यांच्या चांगल्या दिवसांना सुरूवात झाली.
एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी सांगितले की जेव्हा ते खुदगर्ज या चित्रपटाच्या प्रीमियर शो साठी त्यांच्या पत्नी सोबत मर्सिडीज ने जात होते तेव्हा त्यानी आपल्या पत्नीस सांगितले की जर हा चित्रपट फ्लॉप झाला तर आपली या गाडीतील ही शेवटची राईड असेल. पण देवाच्या आशीर्वादाने असे झाले नाही आणि हा चित्रपट यशस्वी झाला. यानंतर राकेश रोशन यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी नंतर एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here