या कारणामुळे दूरदर्शन वाहिनी बनली नंबर १ वाहिनी, जाणून घ्या काय आहे कारण !

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन झाल्यामुळे त्याचा परिणाम वेगवेगळ्या उद्योगधंद्यांवर झालेला दिसून येतो. मग यात टीव्ही इंडस्ट्री तरी मागे कुठे राहील ! टीव्ही वर चालणाऱ्या सर्व मालिकांचे चित्रीकरण सध्या लॉक डाऊन मुळे थांबवले गेले आहेत. आणि जुन्या व गाजलेल्या मालिकांचे पुन्हा प्रक्षेपण केले जात आहे. परंतु असे असून देखील चॅनल चे टीआरपी खूप घसरत चालले आहे.
मात्र हे सर्व दूरदर्शन वहिनीला सुकाळ आल्याचे दिसून येते. लॉक डाऊनच्या आधी सासू सुनेच्या ड्रामा वर आधारित मालिकांमुळे प्रेक्षक वर्ग दूरदर्शन वहिनीला पहायचा बंद झालेला. मात्र आता लॉक डाऊन नंतर दूरदर्शन वाहिनी प्रेक्षकांची आवडती वाहिनी झाली आहे. याचे कारण म्हणजे दूरदर्शन वाहिनीने त्यांच्या आयकोनिक मालिका पुन्हा सुरू केल्या आहेत. दूरदर्शन वाहिनीवर सध्या रामायण, महाभारत , देख भाई देख, बूनियाद, शक्तिमान यांसारख्या मालिका पुन्हा चालू झाल्या आहेत.
या मालिकांमुळे दूरदर्शन वहिनीचा टीआरपी खूप वाढला आहे कारण या मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. प्रसार भारतीच्या सीईओ शशी शेखरने ट्विट करून लोकांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले आहे की दूरदर्शनच्या प्रेक्षकांचे खूप आभार बार्क इंडियाच्या अनुसार देशात १३ व्या आठवड्यात दूरदर्शन सर्वाधिक बघितली जाणारी वाहिनी आहे. पब्लिक ब्रॉडकास्टर मुळे भारतीयांना कोरोनाच्या संकटात घरात सुरक्षित राहण्यास मदत केली. प्रसार भारतीने सुद्धा ट्विट करून सांगितले की दूरदर्शनच्या व्युरोशिप मध्ये १ आठवड्यात मोठी वाढ झालेली दिसते.
तर वर्षाच्या १२ व्या आठवड्यात दूरदर्शनची व्युरोशीप २६७ मिलियन पेक्षा जास्त झाली आहे. तर १३ व्या आठवड्यात २१०९ मिलियन झाली. यावर्षी दूरदर्शनच्या व्यूरोशिप मध्ये ६५०% वाढ झालेली दिसते. तर दुसऱ्या ट्विट मध्ये प्रसार भारती ने सांगितले की, रामायण महाभारत मालिकेच्या रिटेलीकास्ट ने पहिल्याच आठवड्यात रेकॉर्ड तोडला आहे. या दोन्ही मालिकांची व्युरोशिप १०० मिलियन च्या घरात गेली आहे. पहिल्याच आठवड्यात रामायण मालिकेला ५५६ मिलियन आणि महाभारत मालिकेला १५० मिलियन व्युरोशिप मिळाली. हा एक ऐतिहासिक रेकॉर्ड म्हणावा लागेल.

तर बार्कच्या अनुसार पहिल्या आठवड्यात रामायणाच्या ४ शोज ला १७० मिलियन व्ह्युअर्स मिळाले होते. तर शनिवारी पहिल्याच दिवशी रामायण मालिकेच्या ओपनिंग एपिसोड ला ३४ मिलियन व्हयुअर्स होते. त्याची रेटिंग ३.४ इतकी होती. आणि त्याच रात्रीच्या शो ला ४५ मिलियन व्ह्युआर्स सोबत ५.२ रेटिंग मिळाली. तर दुसऱ्या दिवशीच म्हणजेच रविवारी सकाळी ४० मिलियन आणि रात्रीच्या एपिसोड्सला ५१ मिलियन व्ह्युआर्स मिळाले. आता सध्याच्या काळात रामायण मालिका हिंदी जनरल एंटरटेमेंट कॅटेगरी मध्ये सर्वाधिक बघितला गेलेला शो बनला. पी आय बी ने सुद्धा ट्विट करून सांगितले की, रामायण मालिकेच्या रेटेलिकास्टमुळे हिंदी जनरल एंटरटेमेंट चॅनल शो च्या कॅटेगरी मध्ये २०१५ नंतर सर्वाधिक हाईएस्ट रेटींग मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here