महाभारतातील कलाकार सध्या करत आहेत हे काम, जाणून घ्या !

मालिका रामायण प्रमाणेच मालिका महाभारत सुद्धा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. एवढे वर्ष उलटून गेल्यावर सुद्धा आह हि प्रेक्षक तेवढयाच प्रेमाने हि मालिका पाहत आहेत. सोबतच प्रत्येक जण या मालिकेतील कलाकारांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे. म्हणूनच आज आम्ही आपणाला या मालिकेतील कलाकार सध्या काय करत आहेत हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल !
श्री कृष्ण उर्फ नितीश भारद्वाज –
महाभारतातील श्री कृष्ण म्हणजेच नितीश भारद्वाज याना बरे कोणी कसे काय विसरू शकतो. सोबतच आज सुद्धा नितीश भारद्वाज यांचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. याशिवाय नितीश भारद्वाज यांनी आपले नशीब राजकारण क्षेत्रात आजमावून पाहिले आहे. त्याच बरोबर आपल्याला एकूण आश्चर्य वाटेल कि नितीश भारद्वाज हे एक कलाकार असून ते पेशाने डॉक्टर सुद्धा आहेत.
पित्रऋण या त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने तप्रेक्षक आणि समीक्षक यांच्या वर चांगलीच छाप पाडली. काही काळापूर्वीच नितीन भारद्वाज हे चित्रपट केदारनाथ मध्ये आपल्याला दिसले होते. मराठी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक, पित्रऋणसाठी त्यांना अनेक मानांकन पुरस्कार मिळाले होते.
युधिष्टिर उर्फ गजेंद्र चौहान –
महाभारता मध्ये युधिष्टिरची लोकप्रिय भूमिका गजेंद्र चौहान याने साकारली होती. याशिवाय ते एफटी आयचे प्रमुख पद सुद्धा काही काळ सांभाळले होते.
त्यांनी चित्रपट क्षेत्रात सुद्धा आपले नाव कमविले त्यांनी अनेक भूमिका केल्या त्यात काही भूमिका ह्या धार्मिक भूमिका म्हणजे जय माता वैष्णव देवी ह्या चित्रपटात त्यांनी एका भक्ताची प्रमुख भूमिका साकारली होती तसेच बागबान, परवाना, अंदाज सारख्या चित्रपटात देखील आपली छाप पाडली.
द्रौपदी उर्फ रुपा गांगुली –
पांडवाची पांचाली म्हणजेच द्रौपदीची भूमिका टीव्ही अभिनेत्री रूपा गांगुली ने साकारली होती तसेच आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल कि रूपा गांगुली एक गायिका सुद्धा आहेत तसे तर सध्याच्या काळात रूपा गांगुली राज्यसभाच्या सदस्या बनल्या आहेत.
सध्या त्यां संसदमध्ये आपले मत मांडताना पाहायला मिळत आहेत तसेच भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी काम केले. पश्चिम बंगाल मोशन पिक्चर आर्टिस्ट्स फोरमच्या सरचिटणीस  आणि उपाध्यक्ष  म्हणून काम केले, जे सिने कलाकारांचे प्रतिनिधीत्व करणारी एक संस्था आहे.
दुर्योधन उर्फ पुनीत इस्सर –
पुनीत इस्सर ने कौरवांचे मोठे भाऊ आणि महाभारतचे खलनायक दुर्योधनची भूमिका साकारली होती. महाभारत नंतर पुनीत बिग बॉस मध्ये सुद्धा दिसले होते याशिवाय पुनीत एक दिग्दर्शक आणि लेखक सुद्धा आहे. याचसोबत त्यांनी बचना ए हसीनों, बॉर्डर, रेड्डी आणि ऑफ सरदार सारख्या चित्रपटात देखील काम केले आहे.
पुनीत इस्कर हा सलमान खानचा सर्वात लोकप्रिय टीव्ही रियलिटी शो बिग बॉसचा एक स्पर्धक म्हणून देखील आपल्याला टीव्ही वर दिसले होते. ते घरात १०५ दिवस राहिले होते.
अर्जुन उर्फ फिरोज खान –
अर्जुनची भूमिका हि फिरोज खानने साकारली होती. महाभारताशिवाय फिरोज खान करण अर्जुन, यमला पगला दीवाना आणि तिरंगा ,मेहंदी ,करण – अर्जुन सारख्या चित्रपटात सुद्धा आपल्याला दिसले आहेत. कथानक समजून उत्तम भूमिका करणे हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक भूमिका केल्या ज्यात प्रेक्षकानी त्यांना चांगली दाद दिली.
भीम उर्फ प्रवीण कुमार –
भीम ची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांनी ऑलम्पिक मध्ये सहभाग घेतला होता. सोबतच त्यांनी ऑलम्पिक मध्ये हैमर थ्रो मध्ये सुवर्ण पदक सुद्धा जिंकले होते. याशिवाय त्यांनी आशियाई खेळात बँकॉक राष्‍ट्रमंडल खेळ, जमैका, श्रीलंका, कैलिफोर्निया सारख्या देशांच्या विरोधात त्यांनी खेळ खेळला आहे. तब्येत ठीक नसल्याकारणाने प्रवीन कुमार टीव्हीच्या विश्वापासून दूर होत गेले.
शकुनी उर्फ गुफी पेंटल –
अभिनेता गुफी पेंटल ने शातिर मामा शकुनी ची भूमिका साकारली होती, जो नेहमी आपल्या जवळच्या फासे यावर जिंकत असे. आपल्या माहिती साठी सांगतो गुफी पेंटल टीव्ही सॊबतच बॉलिवूड मध्ये देखील त्यांनी काम केले आहे. शेवटचे ते करण संगिनीमध्ये गुफी पेंटल आपल्याला दिसले होते.
भीष्म पितामह उर्फ मुकेश खन्ना –
मुकेश खन्ना ने भीष्म पितामह ययांची भुमीका साकारली होती. तसेच आपण सर्व मुकेश खन्ना ला शक्तिमान या नावाने सुद्धा ओळखतो. काही काळापूर्वी मुकेश खन्ना ने शक्तिमान चे सीक्वल बनवायची घोषणा केली होती. सोबतच मुकेश खन्ना एमके फिल्म्स नामक एक प्रोडक्शन हाउस चालवत आहेत.
कर्ण उर्फ पंकज धीर –
टीव्ही अभिनेता पंकज धीर ने कुंतीपुत्र कर्णची भूमिका साकारली होती. या भूमिकेद्वारेच त्यांनी या दूरचित्रवाणी क्षेत्रात प्रवेश केला होता. आणि त्यांनी साकारलेल्या कर्ण या भूमिकेमुळे ते अल्पवधीत प्रसिद्ध झाले त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले पण महाभारत सारखे यश त्यांना काही मिळाले नाही.
जरी पंकज धीर सध्याच्या काळात आपल्याला कार्यक्रमात कुठे दिसत नसले तरी त्यांनी महादेव, बढ़ो बहू, ससुराल सिमर सारख्या टीव्ही वरील मालिकांमध्ये काम केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here