सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमार च्या नावाने कौतुकाचा वर्षाव होत आहे. इतके पैसे दान करणार्या या अक्षयकुमारची नक्की संपत्ती किती आहे व तो एका चित्रपटासाठी किती फी घेतो याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बॉलीवूड मध्ये खिलाडी अक्षय कुमार हा सर्वाधिक फि घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारकडे १८७० करोडो रुपयांची संपत्ती आहे.
अक्षय कुमारची सर्वाधिक कमाई ही ब्रँड च्या प्रमोशन मार्फत होत असते. अक्षय कुमार एक चित्रपट करण्यासाठी ४५ करोड रुपये फी घेतो तर कोणत्याही एका प्रॉडक्टच्या जाहिराती साठी ६ ते ७ करोड रुपये फी घेतो. चित्रपटात काम करण्याच्या फी व्यतिरिक्त अक्षय कुमार तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर होणाऱ्या कमाईतील काही शेअर म्हणून मोठी रक्कम सुद्धा घेतो. आता तर अक्षय कुमार ची गिनती व्यस्त कलाकारांमध्ये केली जाते. अक्षय कुमार वर्षातून ४ ते ५ चित्रपटांचे चित्रीकरण करतो.
हे वाचा – बॉलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ वापरतो या ब्रँडचे शूज, किंमत पाहून विश्वास नाही बसणार !
अक्षय कुमार मुंबईतील प्राईम जुहू येथे एका मोठ्या घरात राहतो. या व्यतिरिक्त अक्षय कडे ११ महागड्या गाड्या आहेत. अक्षयला वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक चे खूप वेड आहे त्यामुळे त्याच्याकडे काही महागड्या बाईक सुद्धा आहेत. एका रिपोर्टनुसार अक्षयने 300 करोड रुपयांची पर्सनल इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली आहे. अक्षय स्वता एक मार्शल आर्ट खेळाडू आहे. त्याने त्याच्या अभिनयासोबतच एक्शन आणि कॉमेडी च्या जोरावर चित्रपट सृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बॉलिवूडमध्ये असे बरेच कमी अभिनेते आहेत त्यांनी एका पाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत आणि या यादीत अक्षय कुमार चे नाव सुद्धा अग्रगण्य स्थान आहे. २००८ मध्ये अक्षयने स्वतःचे हरिओम इंटरटेनमेंट कंपनी नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. त्यानंतर 2012 मध्ये त्याने ग्रेझिंग गोट पिक्चर्स नावाची दुसरी प्रोडक्शन कंपनी सुरू केली. यासोबतच अक्षय वर्ल्ड कबड्डी लीग च्या खालसा वॉरियर नावाच्या कबड्डी टीमचा मालक आहे.
हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?
हे वाचा – बॉलिवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’च्या मुलाला आवडते हि अभिनेत्री, जाणून घ्या कोण ?
अक्षय कुमार चा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. त्याचे वडील भारतीय सेना मध्ये काम करायचे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात अक्षयने हॉटेलमध्ये एक वेटर आणि त्यानंतर एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते. त्यानंतर अनेक वर्ष अक्षय एक स्टंटमन म्हणून काम करत होता. २००९ मध्ये अक्षयला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यासोबतच २०१७ मध्ये रुस्तम या चित्रपटातील त्याच्या कामासाठी त्याला बेस्ट ऍक्टर म्हणून नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा मिळाला.