अभिनया व्यतिरिक्त हे अभिनेते या गोष्टीतून मिळवतात अमाप पैसे, जाणून घ्या !

चित्रपटांद्वारे आपले मनोरंजन करणारे बॉलीवूड स्टार्स अभिनयाव्यतिरिक्त बरेच व्यवसाय करून भरपूर कमाई करतात.यामध्ये शाहरूख खान,अजय देवगन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश होतो.चला तर मग बॉलीवूडचा कोणता स्टार काय व्यवसाय करतो हे जाणून घेऊया.
सुनील शेट्टी
अभिनेते सुनील शेट्टी चित्रपटांमध्ये काम करून भरपूर पैसे कमावतात. त्याचबरोबर ते अनेक व्यवसाय हाताळतात. सुनील शेट्टी हे एका जिम कंपनीचे मालक आहेत. त्यांचा जिम फ्रॅंचायझी संपूर्ण भारतभर खुला आहे. याशिवाय सुनील पॉपकॉर्न इंटरटेनमेंट या चित्रपट निर्मिती कंपनीचा मालक आहे. त्यांच्या या प्रॉडक्शन हाऊसने आतापर्यंत बारा पेक्षा अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सुनील रेस्टॉरंट चा व्यवसाय करत होते. एका वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार सुनील मिसतिफ हा डायनिंग बार आणि क्लब एचटीयुओ चा मालक आहे. याच बरोबर सुनील रिअल इस्टेट व्यवसायात ही दिसतात.
अजय देवगन
बॉलीवूड चे सुपरस्टार अजय देवगन यांनीही अभिनयाव्यतिरिक्त इतर व्यवसायात गुंतवणूक केलेली आहे. अजय देवगन यांनी गुजरातमधील चरणाका सौर प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे.तसेच रोहा येथील पॉवर प्लांट ग्रुप मध्ये देखील अजयचा मोठा वाटा आहे. याव्यतिरिक्त अजय ‘फिल्म्स’या प्रॉडक्शन हाउस चा मालक आहे. अजय हे व्ही एफ एक्स स्टुडिओचे देखील मालक आहेत.
ऋतिक रोशन
ऋतिक रोशन सुद्धा चित्रपटांशीवाय अनेक व्यवसाय करताना दिसतात. त्यांच्याकडे स्वतःचा फॅशन ब्रँड ‘एच आर एक्स’ आहे;ज्याने ऑनलाइन शॉपिंग पोर्ट माइंटला मोठा हिस्सा विकला.याव्यतिरिक्त ऋतिकने बंगळूरच्या फिटनेस स्टार्ट अप क्युरिट मध्येही भाग घेतला आहे.
सलमान खान
व्यवसाय क्षेत्रात सलमान खान सुद्धा चांगलीच प्रगती करताना दिसतोय. सलमान हे ‘एस के’फिल्म प्रोडक्शन हाऊसचे मालक आहेत. सलमान बरेच चित्रपट यांच्या याच प्रोडक्शन हाऊस मधून बनवलेले आहेत.यात बजरंगी भाईजान ;दबंग थ्री या चित्रपटांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त टीव्हीसाठी सामग्री तयार करणाऱ्या कंपनीचा तो मालक आहे. त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’ तयार केला आहे. यापूर्वी सलमान च्या कंपनीने ‘डान्स रियालिटी शो’देखील तयार केला होता. याशिवाय सलमानने एक ‘स्ट्रॉंग’ नावाची जिम उपकरणे तयार करणारी कंपनी देखील सुरू केली आहे. याशिवाय ते मंधाना रिटेल वेंचर्स चे भागीदार आहेत. त्यांचा बेग ह्यूमन कपड्याचा ब्रँड मंधाना येथून परवानाकृत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here