मेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर..

मेमरी कार्डातील डिलीट झालेला डेटा असा करा रिकव्हर..

टेक्नोलॉजी हल्ली खूप स्मार्ट झाली आहे. पहिले कॅमेऱ्यात रील असायची, मात्र आता तुम्ही एकावेळी 30च्या आसपास फोटो क्लिक करू शकता. आज कॅमेऱ्यासोबतच मेमरी कार्ड मिळतात, ज्याच्या माध्यमातून तुम्ही त्याच्या स्टोरेज कॅपॅसिटीनुसार त्यात फोटो स्टोअर करू शकता, तेही प्रिंट केल्याशिवाय.

मेमरी कार्ड फक्त कॅमेऱ्यातच नाहीत तर इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये जसं स्मार्टफोन यांच्यात सुद्धा वापरलं जातं. त्यामुळेच तर तूमच्या फोनमध्ये एवढे ऍप्स, गाणी, व्हीडिओ, फोटो आणि अन्य प्रकारचा डेटा स्टोर केला जातो. आता स्मार्टफोनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इनबिल्ट स्टोरेज दिला जातो.
या सगळ्यांमध्ये समजा तुमचा पर्सनल डेटा असलेलं मेमरी कार्ड जर डिलीट झालं तर? तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, तुम्ही या सोप्या ट्रिकद्वारे संपूर्ण डेटा परत मिळवू शकता.

कार्ड दुसऱ्या डिव्हाईसमध्ये चेक करा:
मेमरी कार्ड अनेकदा व्हायरस असल्यामुळे डिव्हाईसमध्ये दाखवत ( शो करत) नाही. अशावेळी आपलं मेमरी कार्ड काढून ते दुसऱ्या डिव्हाईसमध्ये घालून चेक करावं.

कार्ड रीडरमध्ये बघा :
तुम्ही मेमरी कार्ड, कार्ड रीडरमध्ये घालून सुद्धा चेक करू शकता. यासाठी स्टार्टवर जाऊन, सर्च बॉक्समध्ये ‘cmd’ टाईप करा. कमांड विंडो ओपन झाल्यानंतर, ड्राईव्हला फॉलो करत “chkdsk” टाईप करा. यानंतर कोलन आणि / एफ टाईप करा. एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समस्येचं समाधान मिळेल. तुम्ही त्याच पद्धतीने स्टेप- बाय- स्टेप कराल तर तुम्हाला आणखीन सोल्युशन सापडतील.

ड्राईव्ह चेक :
अनेकदा सिस्टीम, एसडी कार्डसाठी एक नवीन ड्राइव्ह असाइन करत नाही. अशावेळी ड्राईव्ह ईमध्ये डिस्क इन्सर्ट करायला सांगितलं जातं. अशावेळी या समस्येवर उपाय म्हणून आपल्या ऑपरेटिंग सिस्‍टम सेटिंगच्या माध्यमातून नवीन ड्राईव्ह लेटर असाईन करून या समस्येचं समाधान केलं जाऊ शकतं.

कार्ड प्रॉपर्टी :
एस डी कार्डचा डेटा पुन्हा मिळविण्यासाठी एक उपाय हा पण आहे की, कार्डच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन एकदा स्पेस चेक करा. फाईल जर पूर्ण डिलीट झाल्या असतील तर संपुर्ण स्पेस दिसेल.
अनेकदा फक्त डायरेक्ट्री डिलीट होते. अशा स्तिथीत तुम्ही सॅनडिस्क इनबिल्ट सोल्युशनचा वापर करू शकता, जे तुमच्या डिलीट झालेल्या फाईल्स रिस्टोअर करू शकते.

डिस्क डायग्नोस्टिक टूलच्या सहाय्याने चेक करा:
जर तुम्हाला दिसत असेल की, तुमच्या कार्डात फाईल्स आहेत पण त्या सेव्ह करता येत नाहीयेत. तर अशावेळी तुमचं कार्ड प्रोटेक्टेड मोडवर असेल.
अशावेळी तूम्हाला फाईल सेव्ह करण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी तुम्हाला तो ऑप्शन अनलॉक करावा लागेल. अशा परिस्थितीत तुम्हाला
डिस्‍क डाग्‍नोस्टिक टूलचा वापर करावा लागेल. त्याशिवाय तुम्ही अन्य प्रकारच्या रिकव्हरी सॉफ्टवेअरचा सुद्धा वापर करू शकता. ज्याद्वारे तूम्ही तुमचा डेटा पुन्हा रिस्टोअर करू शकता.

Loading...

LEAVE A REPLY