या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही गुगुलवर चुकूनही सर्च करु नका…

सध्या आपल्याला कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर म्हणावी तितकी अडचण येत नाही. कारण गुगल या मायाजालाने आपल्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या केल्या आहेत. एखादा रस्ता शोधायचा असो किंवा जगाच्या पाठीवरील कोणत्याही गोष्टीची माहिती घ्यायची असो आपण अगदी सहज गुगल करतो आणि आपल्याला हवी ती माहिती घेतो. यातही बहुतांशवेळा गुगल आपल्याला हवी ती माहिती देण्यात यशस्वीही होतो. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर आपल्याला त्याचा विनाकारण होऊ शकतो. पाहूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही गुगुलवर अजिबात सर्च करु नका.
१. आपली ओळख कधीच गुगलवर सर्च करु नका. कारण गुगल आपल्या सर्च हिस्टरीचा डेटा सेव्ह करतो. त्यामुळे आपला सगळा डेटा गुगलकडे असतो. आपण ही ओळख सर्च करुन त्यामध्ये भरच घालतो. त्यामुळे आपली स्वत:चीच ओळख गुगलवर कधीच सर्च करु नका
२. कधी एखादा संसर्गजन्य आजार झाला म्हणून तर कधी दिर्घकालिन आजारासाठी अनेकजण औषधे घेत असतात. हल्ली ऑनलाईन औषधविक्री सर्रास होत आहे. पण आपली औषधे गुगलवर सर्च करु नका. अनेक कंपन्या याची नोंद ठेवतात आणि त्या आपल्याला त्यांची औषधे घेण्यासाठी संपर्क साधू शकतात. तसेच या डेटाचा अन्यही चुकीचा वापर केला जाऊ शकतो.
३. आपण काही वेळा विविध कंपन्यांच्या जाहिराती गुगलवर सर्च करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यामुळे या जाहिरातदार कंपन्या आपले डिटेल्स सेव्ह करतात आणि आपल्याला त्यांच्या जाहिराती सातत्याने पाठविण्यास सुरुवात करतात. त्यामुळे आपल्याला या नको असलेल्या जाहिरातींचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
४. पर्सनल ईमेलसाठी गुगलचा वापर करताना विशेष काळजी घ्यायला हवी. आपण अनेकदा गुगलवरुनच आपले ई-मेल अकाऊंट सुरु करत असतो. आपल्या मेलमध्ये आपले नोकरीशी संबंधित आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी असू शकतात. यामध्ये आपल्या मेलमधील डेटा आणि पासवर्डसारख्या गोष्टी हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे मेलमध्ये सर्च करताना विशेष काळजी घ्यायला हवी.

Loading...

LEAVE A REPLY