पाण्यात किंवा पावसात फोन भिजल्यास लगेचच करा ‘ही’ 5 कामं..

पावसाळ्यात छत्री किंवा रेनकोट वापरलं तरी अनेकदा आपला फोन भिजला जातो. त्यामुळे पावसाळ्यात फोन खुपच काळजीपूर्वक हाताळावा. पावसाळ्यात तुमच्या शरीराची ज्या प्रकारे काळजी घेता त्याचप्रकारे फोनचीही काळजी घ्या अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तुमचा फोन हा वॉटरप्रूफ नाहीये? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात मोबाइलची काळजी कशी घ्यावी किंवा मोबाइल पाण्यात भिजल्यास नेमकं काय करावं यासंदर्भात काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फोन सुरक्षित ठेवू शकाल. पावसात मोबाइल भिजल्यास घाबरून जाऊ नका तर वापरा या खास टिप्स…
फोन स्विच ऑफ करा..
फोन भिजल्यास तो तात्काळ स्विच ऑफ करा आणि कुठल्याही परिस्थितीत तो लगेचच चालू करु नका. भिजलेला फोन तुम्ही फोन चालू केल्यास तुम्हाला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
पार्ट्स वेगवेगळे करा
फोन भिजल्यानंतर त्याचं बॅक कव्हर, बॅटरी, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड हे फोनमधून काढून वेगवेगळे करा. हे पार्ट्स बाहेर काढले नाही तर त्यामध्ये ओलावा कायम राहील.
चांगल्या प्रकारे पुसून घ्यावं..
फोनचा प्रत्येक पार्ट पेपरने किंवा कपड्याने पुसून घ्या.प्रत्येक जागेवरचं पाणी चांगल्या प्रकारे पुसा आणि त्यानंतर सुकण्यासाठी ठेवा. लक्षात ठेवा की, फोनचे पार्ट्स सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर बिलकुल करु नका.
कच्च्या तांदळात मोबाइलचे पार्ट्स ठेवा..
भिजलेले मोबाइल पार्ट्स कच्च्या तांदळात ठेवल्यास ते लवकर सुकतील. अन्यथा हे पार्ट्स पूर्णपणे सुकण्यास अधिक कालावधी लागेल.
उष्णता असलेल्या जागेवर ठेवा..
कच्चे तांदूळ असलेली बॅग उष्णता असलेल्या जागेवर ठेवा. उष्णता असलेली जागा म्हणजे टिव्ही किंवा फ्रीजच्या वर ठेवा. तसेच त्या तांदळात मोबाइलचे पार्ट्स कमीत कमी 24 तास सुकण्यासाठी ठेवा. फोन तात्काळ चालू करण्याचा प्रयत्न करु नका. फोनचे पार्ट्स पूर्णपणे सुकल्यानंतर फोन चालू करा.

‘या’ 9 चुका सर्वच स्मार्टफोन यूझर्स करतात आणि मग होतो पश्चाताप…

अँड्रॉइड स्मार्टफोन वारताना सुरुवातीच्या काळातच आपल्याला सर्व फीचर्स जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. काही दिवस हा स्मार्टफोन वापरल्यानंतर युझर्सला वाटते की आपल्याला फोनसंदर्भात सर्वकाही माहिती आहे आणि त्यामुळे त्या फोनची काळजी करणं आपण सोडून देतो. मात्र, याच दरम्यान युझर्स अशा काही चूका करतात ज्यामुळे नंतर पश्चाताप होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चूका सांगणार आहोत ज्या बहूतेक सर्वच युझर्स करत असतात. या चुका तुम्ही टाळल्यात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
चार्जिंग सायकल..
सर्वात आधी तुम्हाला फोन चार्जिंग संदर्भात माहिती देतो. तुम्ही नेहमी फोन चार्जिंगला लावता आणि नंतर लगेचच तो चार्जिंगहून काढता पण ही एक मोठी चूक आहे. कारण, बॅटरीचं लाइफ सायकल असतं. एकदा फोन चार्जिंगला लावल्यानंतर तो लगेचच काढल्यास एक सायकल संपते.
बॅटरी ऑफ करणे
आपल्या फोनची बॅटरी 20 टक्क्यांहून कमी झाल्यानंतर अनेकजण फोन चार्जिंगला लावतात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, या प्रकारामुळे फोनच्या बॅटरीचा परफॉर्मंस खराब होतो. फोनची बॅटरी 20 टक्क्यांपासून ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज असल्यास नेहमीच चांगले असते.
नकली मोबाइल अॅक्सेसरीज..
कमी किंमतीमुळे नेहमीच युझर्स अनब्रँडेड अॅक्सेसरीज खरेदी करतात ज्यामध्ये बॅटरी, चार्जर सारख्यांचा समावेश आहे. मात्र, या अॅक्सेसरीज तुमच्या मोबाइल फोनसाठी धोकादायक असतात.
कुठूनही अॅप डाऊनलोड करणं
अँड्रॉइड फोनमध्ये थर्ड पार्टी अॅप स्टोर सपोर्ट करत नाही.

https://d2v9y0dukr6mq2.cloudfront.net/video/thumbnail/EhSddnV/businesswoman-smartphone-messaging-woman-in-the-office-chatting-and-sending-messages-with-her-smart-phone-clerk-on-mobile-whatsapp-conversation-female-phone-conversation-at-work_4ykifmkw__F0000.png
यासोबतच तुम्ही साइड लोडींगच्या माध्यमातूनही अॅप इंस्टॉल करु शकता. म्हणजेच तुम्ही कम्युटरवर एपीके फाइल डाउनलोड करुन किंवा ब्ल्यूटुथच्या माध्यमातून एपीके फाइल ट्रान्सफर करणं तुमच्या फोनसाठी धोकादायक आहे. यामुळे तुमच्या फोनमध्ये वायरस येण्याची शक्यता आहे.
एकसारखा पासवर्ड
अनेकजण फेसबुक आणि जीमेलसोबतच सर्व ऑनलाइन अकाऊंटसाठी एकसारखा पासवर्ड ठेवतात. पण ही एक मोठी चूक आहे. कारण, तुमच्या एखाद्या चूकीमुळे तुमचे सर्व अकाऊंट हॅक होण्याची शक्यता असते.
होम स्क्रिनवर जास्त विजेट्स..
वापरण्याकरीता सोप जावं आणि वेळ कमी लागावा यासाठी अनेकजण होमस्क्रीनवर अनेक अँप्सचे शॉर्टकट ठेवतं. पण, या सर्वांमुळे तुमची बॅटरी लवकर संपते.
अपडेट न करणं..
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये नेहमीच अपडेट्स येत असतात मात्र, इंटरनेट डेटा संपत असल्याने अनेकजण अपडेट करत नाही. पण असे केल्यास त्याचा फटका तुम्हालाच बसतो कारण कंपनी नेहमीच आपल्या नव्या अपडेट्समध्ये फोन आणि अँप्स जोडत असते.
फ्री वायफाय..
फ्री वायफाय मिळताच अनेकजण तो कनेक्ट करतात आणि त्याच्या माध्यमातून गाणे किंवा सिनेमा डाऊनलोड करण्यास सुरुवात करतं. पण यामुळे तुमच्या फोनमध्ये वायरस येण्याची मोठी शक्यता असते.
फोन लॉक न करणं
अनेक युझर्स हे आपल्या फोनला पिन नंबर किंवा पासवर्डने लॉक करत नाही. असे केल्यास त्याचा फटका तुम्हाल बसण्याची शक्यता असते. कारण, जर तुमचा फोन चोरी झाला तर त्यामधील संपूर्ण डेटा हा चोरीला जाण्याची शक्यता असते.

Loading...

LEAVE A REPLY