…तर तुमचं फेसबुक अकौंट ३१ मार्च ला बंद होणार …

…तर तुमचं फेसबुक अकौंट ३१ मार्च ला बंद होणार …

केंद्र सरकारच्या अनेक सेवांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. आता फेसबुकलाही आधार कार्ड लिंक करावे लागणार, अशी भीती निर्माण करणारा बदल फेसबुकने केला आहे. आता फेसबुकवर नवे अकाऊंट काढणाताना युझर्सचे नाव आधारप्रमाणे आहे का, याबाबत प्रश्न फेसबुकद्वारे विचारला जात आहे.

सोशल मीडियावर खरे नाव टाकण्यासाठी युझर्सला उद्यकुक्त करण्यासाठी फेसबुकने प्रथमच आधारच्या पर्यायाचा उपयोग केला आहे. फेसबुकचे भारतात दरमहिन्याला २१७ मिलियन युझर्स सक्रिय असतात. त्यापैकी २१२ मिलियन युझर्स हे स्मार्टफोनच्या माध्यमातून सक्रिय असतात. तर जगभरात फेसबुकचे २.१ बिलियन युझर्स सक्रिय असतात. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉटसअॅप या सोशल मीडियावर २०० मिलियन युझर्स भारतात सक्रिय असतात.
फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले, की प्रादेशिक भाषांमध्ये युझर्सचे अकाऊंट काढताना त्यांच्या आधारवरील नाव हे उपयुक्त ठरते. युझर्सच्या मित्रांना नवे अकाऊंट काढणाऱ्याला शोधणे सोपे जाते. हे अनिवार्य नसून ऐच्छिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियात जगभर दबदबा असणारे फेसबुकने अद्याप आधार क्रमांकाचा फॉर्म भरताना पर्याय दिला नाही. मात्र येत्या काळात हा पर्याय दिला तर युझर्सच्या त्रासात भर पडणार आहे.

दरम्यान केंद्र सरकारने डिजीटल क्रांतीसाठी नागरिकांना बॅंकेसारख्या विविध सेवांसाठी आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. केंद्र सरकारने नागरिकांना त्यांची बॅंक खाती, पॅन, मोबाईल अशा विविध सेवांसाठी आधार लिकं करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली आहे.

Loading...

NO COMMENTS

LEAVE A REPLY