विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन मध्ये दिग्गजांची हजेरी ..पहा रिसेप्शनचे खास फोटो ..

विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन मध्ये दिग्गजांची हजेरी ..पहा रिसेप्शनचे खास फोटो ..

अभिनेत्री अनुष्का शर्मा अन् विराट कोहली यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबई येथील सेंट रेगिस हॉटेलमध्ये पार पडत आहे. रिसेप्शन सोहळ्यात अनुष्काने स्लीवलेस चोळी अन् लहंगा परिधान केला असून, विराटने क्रिम कलरच्या ट्राउजरवर नेवी ब्लूक कोटी घातला आहे. या पोशाखात दोघांचेही रूप खुलून दिसत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
दरम्यान, सोहळ्यात बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, दिग्दर्शक आणि निर्माता राजू हिरानी, विधू विनोद चोपडा, अभिनेता बोमन ईराणी, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे, जसप्रित बुमराह आदींनी सर्वांत अगोदर हजेरी लावली. यातील बहुतांश सेलिब्रिटींनी आपल्या परिवारासह सोहळ्यात उपस्थिती लावली.
बॉलिवूडमधून अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि आमिर खान याठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी तब्बल ६०० पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या दाम्पत्याने पहिले रिसेप्शन गेल्या २१ डिसेंबर रोजी दिल्ली येथे दिले होते. या रिसेप्शन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
दरम्यान, अनुष्का आणि विराट सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान हॉटेलमध्ये पोहोचले होते. यावेळी दोघांनीही सोहळ्यात तयारीचा आढावा घेतला. वेळापत्रकानुसार सोहळ्यास सुरूवात झाली असून, त्याकरिता बॉलिवूडसह क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज उपस्थित आहेत. हा सोहळा उत्तरोत्तर रंगत आहे.

Loading...

NO COMMENTS

LEAVE A REPLY