हे वाचा ..फाशीच्या शिक्षेनंतर न्यायाधीश पेनाची निब का तोडतात आणि सुर्योदर्यापूर्वी फाशी का दिली जाते..

जगामधील प्रत्येक देशाच्या शिक्षा देण्याच्या पद्धती आहेत. त्यामध्ये भारतात हि काही पद्धती आहेत. त्या शिक्षेनुसार फाशीची शिक्षा हि सर्वात मोठी मानली जाते. हि शिक्षा हि खुल्या जागेत न देता चार भिंतीच्या आत मध्ये दिली जाते आणि सदरची शिक्षा सुनावत असताना डॉक्टर, जल्लाद – फाशी देणारा माणूस , दंडाधिकारी, तुरुंग अधीक्षक तिथे उपस्थित असतो . या शिक्षेपूर्वी काही तयारी केली जाते ती आता आपण बघुयात..

फाशीच्या शिक्षेनंतर न्यायाधीश पेनाची निब तोडतात?

s3.scoopwhoop.com

भारतात फाशी ही सर्वोच्च शिक्षा आहे. गुन्हेगार असला तरीही व्यक्तीच्या मृत्यूबाबत निर्णय घेतला गेल्यामुळे पेनाची निब तोडण्याची पद्धत आहे. अर्थातच यामुळे त्या पेनाचा पुन्हा वापर करता येत नाही.

शेवटची इच्छा पूर्ण केली जाते का?

vignette.wikia.nocookie.net

तुरुंग प्रशासनाकडून शेवटच्या इच्छेबाबत विचारणा केली जाते. या इच्छांमध्ये नातेवाईकांची भेट, एखादा आवडता पदार्थ किंवा धर्मग्रंथाचं वाचन यासारख्या काही इच्छांचा समावेश आहे.

फाशीपूर्वी जल्लाद काय म्हणतो?

फाशी देण्यापूर्वी जल्लाद माफी मागतो. ‘हिंदू भाईयों को राम-राम, मुस्लमान भाईयों को सलाम, हम क्या कर सकते है हम तो हुकुम के गुलाम’ असं जल्लाद म्हणतो.
मृतदेह फासावर किती काळ लटकवला जातो?

analyteguru.com

मृतदेह किती काळ फासावर लटकवत ठेवावा याबाबत कुठलीही नियमावली नाही. मात्र सर्वसाधारणपणे 10 मिनिटांनंतर मेडिकल टीम मृतदेहाची तपासणी करते आणि व्यक्तीला मृत घोषित करते.

सुर्योदर्यापूर्वी फाशी का दिली जाते ?
सुर्योदयापूर्वी फाशी देण्याची प्रथा आहे. पहाटे ३.४५ वाजता फाशी देण्यात येणाऱ्या व्यक्तीला उठवलं जातं. आंघोळ आटपून नवे कपडे दिले जातात. त्यानंतर त्याच्या धर्मानुसार प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी, आवडीचा नाश्ता आणि आरामासाठी वेळ दिला जातो. त्यानंतर फाशीच्या ठिकाणी नेलं जातं.

१ . कायदेशीर कारण

gopusa.com

न्यायालयाने सुनावलेल्या दिवशी २४ तासांच्या आत जर जेल प्रशासन गुन्हेगाराची फाशी पूर्णत्वास नेण्यास अपयशी ठरले तर जेल प्रशासनाला परत अर्ज करून नवीन तारीख घ्यावी लागते. आणि तसे करने पण न्यायालयाचा अवमान समजला जातो . त्यामुळे त्याच दिवशी पहाटेच तयारी करून फाशी दिली जाते . सुर्योदयापूर्वी फाशी देण्याची प्रथा आहे.

२. प्रशासकीय कारण

http://cameronpsg.com

पहाटे 3.45 वाजता फाशी देण्यात येणाऱ्या व्यक्तीला उठवलं जातं. आंघोळ आटपून नवे कपडे दिले जातात. त्यानंतर त्याच्या धर्मानुसार प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी, आवडीचा नाश्ता आणि आरामासाठी वेळ दिला जातो. त्यानंतर फाशीच्या ठिकाणी नेलं जातं.
जेल मॅन्युअलनुसार तुरुंगातील सर्व काम सुर्योदयानंतर केली जातात. फाशीमुळे दिवसातील कुठलीही कामं प्रभावित होऊ नये यासाठी सुर्योदयापूर्वीच फाशी दिली जाते

३. नैतिक कारण –

ols.cjc.edu.bz

ज्या माणसाला फाशी द्यायची आहे त्याला पूर्ण दिवस वाट बघायला सांगितल्या मुळे त्याच मानसिक खच्चीकरण होऊ शकत. त्याला मृत्यूची शिक्षा सुनावलेली आहे नाकी मानसिक टोर्चेर. आणि त्यामुळे भीतीपोटी गुन्हेगार स्वताला इजा करून घेऊ शकतो आणि त्यामुळे सुनावलेली शिक्षा देत असताना अडचण येऊ शकते. त्या नंतर मेडीकल चाचणी, खतावणी मध्ये नोंदणी आणि गुन्हेगाराचे मृत शरीर जर सकाळी लवकर त्याच्या कुठूम्बियाना मिळालं तर ते अंतिम संस्कार वेळेत करू शकतात .

४. सामाजिक कारण

mercurynews.com

एखाद्या माणसाला फाशी देन म्हणजे त्याने प्रभावित असलेला समाज उद्विघ्न होण्याचे कारण होऊ शकते त्यामुळे सकाळी सर्व शांत असताना या गोष्टी सोप्या होऊ शकतात. त्यामुळे समाजाला कुठलाही उपद्रव होऊ नये म्हणून सकाळी फाशी दिली जाते.

Loading...

LEAVE A REPLY