व्हिडीओ : सौरव गांगुली हे म्हणाला सानिया मिर्झाला पाहून, सगळ्यांसमोर केला त्याने...

व्हिडीओ : सौरव गांगुली हे म्हणाला सानिया मिर्झाला पाहून, सगळ्यांसमोर केला त्याने खुलासा..

व्हिडीओ : सौरव गांगुली हे म्हणाला सानिया मिर्झाला पाहून, सगळ्यांसमोर केला त्याने खुलासा..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मॅचवेळी कॉमेंट्री करताना सेहवागने पाकिस्तानला भारताचा बेटा असल्याचं म्हंटलं होतं. यानंतर वाद वाढला होता. जो आपल्याला भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधल्या पराभवानंतरही दिसुन आला. पण त्यावरच हा वाद थांबला नाही, भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने सानिया मिर्झावर केलेल्या कमेंटमुळे पुन्हा नवीन वाद उभा राहिलाय.
पाकिस्तान- इंग्लड मॅचच्या दरम्यान सौरव असं म्हणाला :
हा प्रकार आहे 14 जूनला झालेल्या पाकिस्तान- इंग्लड मॅचच्या दरम्यानचा. मात्र याचा व्हीडिओ आताही व्हायरल होताना दिसतोय. खरंतर, या मॅचच्या दरम्यान जेव्हा सौरव गांगुली कॉमेंट्री करत होता, त्याचवेळी सानिया मिर्झावर कॅमेरा आला असताना सौरवने हे बघा पाकिस्तानचे एक समर्थक.. आमची टेनिस स्टार असं म्हंटलं होतं.
हे त्या दरम्यान घडलं जेव्हा पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पहिला सेमिफायनलचा सामना सुरू असताना सानिया पाकिस्तानला सपोर्ट करण्यासाठी गेली होती. सानियाने पाकिस्तानचा फलंदाज शोएब मालिकसोबत लग्न केलं आहे, आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी ती नेहमी मॅचला हजेरी लावत असते.
हे बघा पाकिस्तानची एक समर्थक.. आमची टेनिस स्टार :
सौरव गांगुलीने कॉमेंट्री करताना स्क्रीनवर सानिया दिसताच ‘पाकिस्तानी समर्थक’ असं संबोधले होते. ही मॅच जिंकून पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटींग करणाऱ्या इंग्लंडला 49.5 ओव्हर्समध्ये 211 रन्समध्ये रोखले होते.
इंग्लंडने दिलेल्या या लक्ष्याचा पाकिस्तानने 37.1 ओव्हर्समध्येच यशस्वी पाठलाग केला. त्यानंतर त्यांचा सामना भारतासोबत फायनलमध्ये झाला, आणि या सामन्यात पाकिस्तानने वनडे क्रिकेटमधील नंबर 1 ची टीम असलेल्या भारताला तब्बल 180 धावांनी पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केली.

बघा, सौरव गांगुली सानिया मिर्झाला काय म्हणाला होता-

Loading...

NO COMMENTS

LEAVE A REPLY