मला आता कळाले की लग्नानंतर सुद्धा प्रेम होते.

आजच्या युगात बहुतेकांना प्रियकर किंवा प्रेयसी असते. काही व्यक्तींना तर अरेंज मॅरेज ची भीती वाटते. त्यांचे मत असे असते की ज्या व्यक्तीला आपण भेटलो नाही, ओळखत नाही त्या व्यक्तीसोबत आयुष्य कसे काढायचे. पण असा विचार करणे चुकीचे आहे. लग्न हे एक असे बंधन आहे जे दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबाना जोडते.राहुल हा एका बँकेत मॅनेजर आहे. त्याचे लग्नाचे वय झाले होते म्हणून त्याची आई त्याच्यासाठी स्थळ पाहत होती. तिच्या ओळखीच्या व्यक्तीने तिला एका सरिता नावाच्या मुलीचा फोटो दिला आणि असे सांगितले की ही मुलगी तुमच्या राहुल साठी योग्य आहे. आईला सरिता चा फोटो खूप आवडला. जेव्हा राहुल घरी आला तेव्हा आईने त्याला सरिताचा फोटो दाखवला. त्याने आयुष्यात कधीच प्रेम केले नव्हते. पण सरिताचा फोटो बघून त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली.

कदाचित त्याला तिचा फोटो बघून तिच्यावर प्रेम झाले होते. तिचा फोटो पाहिल्यावर त्याला तिला पहायची घाई झाली होती. त्याच्या आईने सरिताच्या आई-वडिलांनकडून बघायच्या कार्यक्रमाची वेळ निश्चित करून घेतली. शेवटी तो दिवस आला त्याचे आईवडील आणि त्याचा लहान भाऊ हे चौघेजण तिच्या घरी जायला निघाले. जस जसे तिचे घर जवळ येत होते तस तसे राहुलचे हृदय खूप धडधडत होते. जेव्हा तो घरात शिरला तेव्हा सरिताच्या आईने त्याचे स्वागत केले. पण त्याचे मन तिलाच शोधत होते. दोघांच्या आई-वडिलांचे सवांद चालू होते.

पण राहुल चे मन फक्त सरितालाच शोधत होते. जेव्हा सरीताची आई म्हणाली की, मी सरिताला आणते. तेव्हा तो एकदम कासावीस झाला. सरिताची आई सरिताला घेऊन आली. राहुलने जेव्हा तिला समोर पहिले. तेव्हा तो तिला बघतच राहिला. पण सरिता खाली मान घालून होती. ती कोणाकडे बघत नव्हती. कदाचित तिला भीती वाटत असेल. तिने राहुलकडे सुद्धा बघितले नाही. राहुलला वाटले हे सगळं तिच्या मनाविरूद्ध तर नाही. दोघांच्या आई-वडिलांनी एकमेकांना आवडी निवडी विचारण्यासाठी बाहेर पाठवले.दोन मिनिट तर शांततेने गेला. शेवटी राहुल ने तिला विचारले की हे लग्न तुझ्या मनाविरूद्ध आहे का? सरिता मान खाली घालूनच नाही बोलली. बाकीचा वेळ शांततेत गेला. त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली.तो दिवस आला त्यांच्या लग्नाची वेळ आली. दोघेही अंतरपाटावर जन्मोजन्मीची साथ देण्याचे वचन घेत होते. लग्न होऊन जेव्हा ती माहेरचा निरोप घेत होती तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू त्याने पहिले होते. त्याने तिचा हात धरला आणि तिला धीर दिला. त्याच वेळी पहिल्यांदाच वरती मान करून त्याच्या डोळ्यात पहिले आणि त्याच्या डोळ्यात थांबलेले अश्रू बघून तिच्या मनात त्याच्या विषयी आदर वाढला.

लग्नाच्या रात्री जेव्हा तो रूम मध्ये गेला तेव्हा सरिता त्याचा रूम मध्ये होती. त्याला वाटले ती घाबरली असेल म्हणून तो रूम मधून बाहेर जात होता तेव्हा तिने अहो म्हणून हाक मारली. राहुलने खरतर पाहिलांदाच तिचा आवाज ऐकला होता. तो तिच्या जवळ गेला आणि बसला. ती म्हणाली की, “मला तुमच्याशी काही तरी बोलायचे आहे”. तो म्हणला, “हा बोल ना”, ती म्हणाली, “माझे स्वप्न होते की माझे कोणावर तरी प्रेम असावे आणि मी त्याचाशीच लग्न करावे. त्यामुळेच जेव्हा तुम्ही मला बघायला आला होतात, तेव्हा मी तुमच्याशी काही बोलले नाही. पण आज मी जेव्हा माझ्या माहेरच्यांचा निरोप घेताना रडत होती.तेव्हा तुमच्या डोळ्यातील माझ्यासाठी थांबलेले अश्रू पाहून तुमच्या विषयी माझ्या मनात आदर वाढला आणि कदाचित तुम्ही मला आवडायला लागले आहात. मी माझ्या साथीदारा बद्दल जे देवाकडे मागितले त्याच्या पेक्षा जास्त देवाने मला दिले आहे आणि मला आता कळाले की लग्नानंतर सुद्धा प्रेम होते.

Loading...

प्रतिक्रिया द्या