मुंबईतले सर्वात महागडे बंगले तुम्हाला माहिती आहेत का?

मुंबईत घरांची किंमत काय असते हे सर्वसामान्यांना चांगलच माहिती आहे. ऎतिहासिक महत्व असलेल्या आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात भारतातील सर्वात महागडे बंगले आहेत. या बंगल्यांची किंमत ऎकूनच माणूस थंड होतो. अनेक उद्योगपती, कलाकारांचे हे बंगले आहेत. जुने बंगले अनेकांनी मोठ्या किंमतीत विकत घेतले आहेत. चला तर जाऊन घेऊया मुंबईतील अशाच काही महागड्या बंगल्यांच्या किंमती.मुकेश अंबानी यांचा अँटेलिया हा बंगला मुंबईत आहे. या बंगल्याची किंमत ६७०० कोटी रुपये असून ४० लाख स्क्वेअर फूटमध्ये हा बंगला बांधलाय. हा मुंबईतील सर्वात महागडा बंगला आहे. या बंगल्यात मोठ्या सुविधा असून यावर हेलिपॅडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अंबानी यांचा ४ लाख चौरस फूट क्षेत्राचे २७ मजली अँटेलिया बंगला फोर्ब्जच्या महागड्या घरांच्या यादीत अव्वल आहे. अँटेलियावर झालेल्या खर्चात व अन्य घरांतील खर्चात मोठी तफावत आहे. अँटेलियावर १ अब्ज डॉलर (५९ कोटी ५० लाख रुपये) ते २ अब्ज डॉलर खर्च झाल्याचा अंदाज आहे. २००८ मध्ये या घराची किंमत २२२ दशलक्ष डॉलर होती.

शाहरूख खान याने हा बंगला विकत घेतला होता तेव्हा त्याची किंमत १५ ते २० कोटी इतकी होती. आता या बंगल्याची किंमत २ हजार कोटी सांगितली जाते. हा बंगला मुंबईतील तिसरी सर्वात महागडी प्रॉपर्टी असल्याचे म्हटले जाते. ६ हजार स्केअर फूटात पसरलेल्या या बंगल्यात जिम, स्विमिंग पूल अशा सर्वच सुविधा आहेत.जाटिया हाऊसजवळच असलेला आणखी आयकॉनिक बंगला म्हणजे मेहरांगिर हाऊस..भारतीय शास्त्रज्ञ होमी जे भाभा यांचा हा बंगला आहे. त्यामुळे या प्रॉपर्टीचं म्युझियम करण्यात यावं अशी अनेकांची इच्छा आहे. या बंगल्याची किंमत ३७२ कोटी असून १५ हजार स्केअर फूटाची ही प्रॉपर्टी आहे. हा बंगला स्मिता क्रिष्णा गोदरेज यांना ३७२ कोटी रूपयांना विकण्यात आला आहे. ११५ कोटी जादा पैसे देऊन हा बंगला खरेदी करण्यात आला आहे.मुंबईतील या बंगल्याची किंमत ४२५ कोटी रूपये इतकी असून ३० हजार स्केअर फूट इतकी ही प्रॉपर्टी आहे. ‘जाटिया हाऊस’ ही मलबार हिल परिसरातील एक महागडी प्रॉपर्टी आहे. आता ही प्रॉपर्टी कुमार मंगलम बिर्ला यांनी विकत घेतली आहे.

महिंद्रा ग्रुपने हा बंगला २७० कोटी रूपयांना विकत घेतला आहे. नेपियन सी रोडवर असलेल्या या बंगल्यात आनंद महिंद्रा यांचा जन्म झाला होता आणि ही डिल होईलपर्यंत या बंगल्यात ते भाडेकरू म्हणून राहत होते. त्यानंतर त्यांनी हा बंगला २७० कोटी रूपयांना विकत घेतला. १३ हजार स्केअर फूट हा बंगला आहे.लिंकन हाऊस हा बंगला सुद्धा मुंबईतील सर्वात महागड्या प्रॉपर्टीपैकी एक आहे. यूएस काऊन्स्युलेट म्हणूनही हा बंगला प्रसिद्ध आहे. हा बंगला पूनावाला ग्रुपचे चेअरपर्सन सायरस पूनावाला यांनी विकत घेतला आहे. हा जुना बंगला विकण्याचा पूनावाला यांचा कोणताही प्लॅन नाहीये. या बंगल्याला रिडेव्हलपमेंट करण्यासाठीही अनेक अडचणी आहेत. त्यामुळे साधारण ५० हजार स्केअर फूटाची ही जागार ते केवळ परिवाराच्या राहण्यासाठीच वापरणार आहेत.

Loading...

प्रतिक्रिया द्या