20 ते 40 या वयादरम्यान करू नका ही कामं, अन्यथा आयुष्यभर दुर्भाग्य पाठ सोडणार नाही !

licdn.com

20 ते 40 हे वय असं असतं की या दरम्यान व्यक्ती सगळ्यात अधिक उर्जावान असतो. तो आपल्या सगळ्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी अफाट प्रयत्न करत असतो. आपल्या ऊर्जेच्या नादात आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्यापुढे जावून आपल्यासाठी दुर्भाग्यपूर्ण ठरू शकतात. जेणेकरून एक विशिष्ट प्रकारचं जीवन जगण्याची वेळ तुमच्यावर येवू शकते. दुर्भाग्यपूर्ण सवयी- काय हे वाचून तुम्ही सुद्धा विचारात पडलात की तुम्ही सुद्धा दुर्भाग्याला आमंत्रित करणारी कामं केली आहेत? पुढे आम्ही अशा काही सवयी तूम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही स्वतःच अंदाज बांधू शकणार आहात की तुमचं भविष्य कसं असणार आहे.
1. शरीर स्वास्थ्याकडे लक्ष न देणे-

greatist.com

या वयात स्वास्थ आणि शरीर आपल्या सोबत असतं. याच दरम्यान आपण आपल्या खाण्या- पिण्याकडे विशेष लक्ष देत नाही. अनियमित जेवणाच्या वेळा आणि जंक फूडमुळे शरीराचं मोठं नुकसान होतं आणि याच परिणाम वाढत्या वयासोबत दिसायला लागतो. भविष्यात तुमचं शरीर अशक्त होईल आणि त्याला तूम्हाला पहिल्यासारखं उर्जावान बनवता येणं शक्य होणार नाही. वाढत्या वयात तुम्ही कितीही पोषणतत्व असलेलं जेवण करा, मात्र त्यावेळी शरीर हे सगळं एब्जॉर्ब करू शकत नाही. यासाठी आतापासूनच आरोग्यासाठी हानिकारक खाणं बंद केलं पाहिजे. एक हेल्दी लाईफस्टाईलचा आपण अंगीकार केला पाहिजे. जेणेकरुन आपलं शरीर मजबूत राहून म्हातारपणी शारीरिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
2. बचत न करणे-

http://moneywithmoxie.com

20 ते 30 हे वय असं असतं की याच दरम्यान आपण कमवायला शिकतो अथवा सुरुवात करतो. पहिल्यांदाच आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अनुभव याच दरम्यान घेत असतो. मात्र बहुतेक लोक याचा अनुभव घेण्यासाठी खाण्या- पिण्यासाठी आणि मजा मस्ती करण्यासाठी खर्च करताना दिसतात. ते भविष्यासाठी कोणत्याही प्रकारची योजना तयार करत नाहीत. तसेच पैसे वाचविण्याची तर त्यांना सवयच नसते. तुम्ही सुद्धा ऐकलंच असेल वेळ एकसारखी कधीच नसते. यासाठी आतापासूनच बचत करायला हवी. कारण वयाच्या एका ठराविक काळानंतर तुम्हाला कौटुंबिक जबाबदारी सुद्धा घ्यावी लागते. बचत न करण्याची सवय तुम्हाला विविध प्रकारच्या समस्यांत टाकू शकते.
3. ट्रॅव्हलिंग-

chill.ie

जास्त करून असं बघितलं जातं की, लोक नोकरीच्या जबाबदारीतुन मोकळे झाल्यानंतर फिरण्याला पसंती देतात. तर तरुणपणात फक्त पैसे कमविणे आणि भविष्य सेक्युर करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र आपण नेमकं हेच विसरतो की याच वयात आपलं शरीर अधिक मजबूत आणि ऊर्जावान आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंग आणि अन्य कोणत्याही ऍक्टिव्हिटीजसाठी यापेक्षा चांगला वेळ दुसरा कोणता असूच शकत नाही. वय वाढल्यानंतर पैसे आणि वेळ असून सुद्धा आपल्याला शरीरस्वास्थ्यामुळे हे सर्व करता येत नाही.
4. कुटुंबाला वेळ न देणे-

healthcart.com

करियरमध्ये पुढे जाण्याच्या नादात हल्लीचा युवा वर्ग इतका व्यस्त होवून जातो की आपल्या कुटुंबाला सुद्धा त्यांना वेळ देता येत नाही. आज जरी तुम्हाला या गोष्टींचा काही फरक पडत नसता तरी भविष्यात तुम्हाला या अनमोल क्षणांची किंमत नक्कीच कळते. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या संबंधित किंवा महत्वाच्या क्षणी तुम्ही तेथे हजार नव्हता तर तुम्हाला त्याचा पश्चाताप नक्की होईल.
5.लग्न करण्याची घाई किंवा एखाद्या वाईट नात्यात फसून राहणे-

marriage.com

लोकांना असं वाटतं की नोकरी लागली की लगेच लग्न व्हायला हवं, मात्र असं होता कामा नये. लग्न आयुष्यभर निभावण्याचं बंधन आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही लग्न तर करता मात्र कालांतराने त्यात समस्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. आपण वाट बघतो की वेळ आली की सगळं काही ठीक होईल. मात्र वेळेनुसार नातं घट्ट होण्याऐवजी आणखीण बिघडताना दिसतं. मुलं मोठी होतात आणि वयाच्या वाढत्या काळात तुम्हाला ते नातं तोडावं लागतं. याचा वाईट प्रभाव फक्त तुमच्यावर नाही तर तुमच्या मुलांवर सुद्धा पडत असतो.
6. आई- वडील आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचं न ऐकणे-

standard.net

तरुणवयात आपल्याला आपण केलेलं प्रत्येक काम बरोबर वाटत असतं. नवीन विचारासोबत तुम्ही इतक्या उत्साहात असता की तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी आणि विचार जुने किंवा कमी दिसू लागतात. पण आपण हे कधीच विसरू नये की आपले आई- वडील जगण्याच्या या संघर्षात आपल्यापेक्षा अधिक अनुभवी आहेत. यासाठी त्यांचं लक्षपूर्वक ऐका.
7. नावडत्या नोकरीमध्येही टिकून राहणं-

licdn.com

अनेकदा तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळतेच असं नाही. मात्र करियरची सिक्युरिटी आणि आर्थिक परिस्थितीशी लढण्यासाठी आपण तडजोड करतो. यामुळेच मनात नसताना सुद्धा आपल्याला ती नोकरी करावी लागते. मात्र असं होता काम नये आणि तुम्ही लगेच ती नोकरी सोडावी अन्यथा काही काळानंतर तुम्ही स्वतःच त्या नावडत्या नोकरीला तडजोड म्हणून अधिक महत्त्व देऊ लागाल आणि त्यामुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.
8.आई- वडिलांच्या आनंदासाठी आपल्या स्वप्नांना सोडून देणं-

http://photobucket.com

तुम्ही फक्त अशा कामांमध्ये यशस्वी होवू शकता जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येतं. काही लोक अनेकदा आपल्या आई- वडिलांच्या आनंदासाठी असं करियर निवडतात ज्यात त्यांना जरासुद्धा आवड नसते. याचा त्यांच्या कामगिरीवर फार मोठा परिणाम होतो आणि त्यांना हवं तितकं यश मिळवता येत नाही. त्यामुळे वेळीच आपल्या क्षमतांना ओळखून आपल्या लक्ष्याचा दिशेने वाटचाल करावी. आई- वडील तूम्हाला जीवन जगण्याची पद्धत, समस्यांना तोंड देण्याची हिम्मत देतात. असं नाही की त्यांना ज्या कामात मोठं यश मिळालंय त्याच कामात तुम्हीही यशस्वी व्हायला हवं. यासाठी तुम्ही त्यांना विश्वासात घेवून करियर निवडताना विचार करून आपल्या आवडीनुसार करियरची निवड करावी.

Loading...

LEAVE A REPLY