तिरुपती बालाजी ला केलेल्या अर्पण केलेल्या केसांचं काय होता तुम्हाला माहिती आहे का ?

भारतातील तीर्थक्षेत्रंमध्ये प्रसिद्ध असे हे तिरुपती क्षेत्र आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्हय़ात तिरुपती हे शहर. याच शहराच्या जवळ असलेल्या डोंगरावर बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे म्हणतात.

tirumala
www.tirumala.org/

तिरुमला डोंगर रांगेत एकूण 7 डोंगर आहेत. त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. म्हणून या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. संपूर्ण डोंगर हा लाल दगडाचा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 853 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उन्हाळय़ातही थंडावा असतो. भगवान वेंकटेशाचे मंदिर असलेल्या पर्वताला ‘वेंकटाचल’ असेही म्हटले जाते. या डोंगरावर ‘कपिलितीर्थ’ नावाचे सरोवर आहे.

gotirupati.com

‘तिरु’ म्हणजे ‘लक्ष्मी’ लक्ष्मीचा पती म्हणजे ‘तिरु पती’ (विष्णू). तेलुगू व तमिळ भाषेत ‘मला/मलई’ म्हणजे ‘डोंगर/पर्वत’. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. तिरुपती राजधानी हैदराबादपासून 740 किलोमीटरवर आहे. तर शहरापासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. बरेचसे भाविक हे अंतर अनवाणी पार करतात. वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. असे मानले जाते कि या दिवशी बालाजीचे दर्शन घेतल्यास सर्व पापातून मुक्ती होऊन त्याला मुक्ती मिळते. दररोज सुमारे 5क् हजारांहून भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात. ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी ब्राम्होत्सव साजरा केला जातो. सुमारे 9 दिवस हा उत्सव असतो.

तिरुपतीमध्ये का केले जाते केसांचे दान ?

thehindubusinessline.com

दक्षिण भारतातील सर्व मंदिर आपल्या भव्यता आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत, परंतु तिरुपती बालाजीचे मंदिर सर्वात जास्त लोकप्रिय आहे. तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते, कारण येथे दररोज लाखो-कोटींचे दान केले जाते.

तिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात, तिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. धार्मिक मान्यतेनुसार, जो व्यक्ती स्वतःच्या मनामधील सर्व पाप आणि वाईट सवयी येथे सोडून देतो, त्याचे सर्व दुःख देवी लक्ष्मी नष्ट करतात. यामुळे येथे स्वतमधील सर्व वाईट सवयी आणि पापांना लोक केसाच्या रुपात सोडून जातात. ज्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न होऊन नेहमी धन-धान्याची कृपा कायम ठेवतील.

staticflickr.com

रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे वृत्तपत्रत देवस्थानला 74 कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले होते. इंटरनेटद्वारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती. इंडिया टूडे या वृतपत्राच्या माहिती नुसार २०११ – २०१२ मध्ये या केसांचा निलाव २०० कोटी रुपयाला झाला. मंदिराचे मुख्य अधिकारी सुब्रमण्यम यांनी २०१३ ची माहिती देताना २०१३ मध्ये ५१,७५८ किलो केस हे ८३.५३ कोटी रुपयाला विकले गेले याची माहिती दिली

http://tirupatibalajitemples.blogspot.in

(Source – https://www.telegraphindia.com/1130203/jsp/nation/story_16516703.jsp and
http://www.india.com/travel/articles/tirupati-balaji-temple-do-you-know-why-it-is-the-richest-temple-in-the-world/
http://indiatoday.intoday.in/story/tirumala-temple-earns-huge-money-from-auctioning-human-hair/1/199003.html
)

मंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठय़ा इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात. येणा:या भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणा:या पुढे जाऊन उभे राहावे लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते. दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.

howtosellremyandvirginhair.files.wordpress.com

येथील व्यवस्थाही पाहण्या जोगी आहे. केस काढणा:याला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

http://photos.wikimapia.org/

तिरुपती मंदिरात केशदान करण्याची प्रथा आहे. या प्रथे अंतर्गत भक्त स्वतःचे केस देवाला समर्पित करतात. याच अर्थ, केसांसोबत स्वतःचा अहंकार देवाला समर्पित केला जातो. मंदिराजवळ ‘कल्याण कट्टा’ या ठिकाणी सामुहिक रुपात केशदान केले जाते. केशदान केल्यानंतर येथेच स्नान केले जाते आणि त्यानंतर पुष्करणीमध्ये स्नान करून मंदिरात दर्शनासाठी भक्त जातात.

Loading...

LEAVE A REPLY