लग्नाआधी ही कामं करायच्या तुमच्या आवडत्या क्रिकेटर्सच्या पत्नी..

लग्नाआधी ही कामं करायच्या तुमच्या आवडत्या क्रिकेटर्सच्या पत्नी, साक्षी धोनीपासून प्रियंका रैनापर्यंत आहेत नावं, प्रत्येकाचं होतं एक वेगळं प्रोफेशन, वाचा-

जेव्हा पण क्रिकेटर्सबद्दल चर्चा होते तेव्हा फोकस फक्त त्यांच्या खेळावर नाही, तर त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल देखील चर्चा होत असते. फॅन्स हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात की त्यांच्या आवडत्या खेळाडूचं वयक्तिक आयुष्य कसं आहे? त्याची गर्लफ्रेंड किंवा पत्नी कोण आहे. त्यांनी यश मिळविण्यासाठी काय काय केलं. जसं की अनेकांना माहितीये की धोनीची बायको साक्षी आणि युवराजची बायको हेजल आहे. पण हे कुणालाही फारसं ठाऊक नसतं की त्यांच्या पत्नी लग्नाआधी काय करायच्या. कारण जास्त वेळेस या खेळाडूंच्या
पत्नी स्टेडियममध्ये बसुन खेळाडूंना चीयर करताना दिसतात. मात्र याशिवाय अन्य काही गोष्टी होत नाहीत. आज आम्ही तूम्हाला स्टार क्रिकेटर्सच्या पत्नींशी संबंधित काही मजेशीर गोष्टी सांगणार आहोत.

प्रियंका चौधरी-
भारताचा स्टार बॅट्समन सुरेश रैनाच्या पत्नीने बी. टेक केलं आहे. लग्नाच्या आधी प्रियंका एक आयटी फर्ममध्ये काम करायची. तसेच तिने एम्स्टर्डमच्या
एक बँकेत काम सुद्धा केले आहे.

सफा बैग-
टीम इंडियाचा एकेकाळचा स्टार ऑलराउंडर इरफान पठानची बेगम सफा दिसायला खूप सुंदर आहे. मात्र पठाणच्या सोबत असताना ती नेहमीच बुरख्यात दिसते, लग्नाआधी सफा एक मॉडल होती.

साक्षी धोनी-
कॅप्टनकूल नावाने फेमस असलेला भारताचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. साक्षीने कलकत्त्याच्या ‘ताज बंगाल होटल’ मध्ये इंटर्नशिप सुद्धा केली आहे.

रितिका सजदेह-
भारताचा स्टार ओपनर रोहित शर्माची पत्नी रितिका नेहमी मॅच दरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. खरंतर रितिका रोहित आणि अन्य खेळाडूंची स्पोर्ट्स मॅनेजर राहिली आहे.

दीपिका पल्लीकल-
दीपिका पल्लीकल, दिनेश कार्तिकची दुसरी पत्नी आहे. या दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्वल केलं आहे. दिपिका भारताची स्टार स्कॉश प्लेयर आहे.

शीतल गौतम-
टीमचा स्टार बॅट्समन रॉबिन उथप्पाने 2016 साली शीतल गौतमसोबत लग्न केलं आहे. शीतल एक टेनिस प्लेयर आहे.

हसीन जहां-
आपल्या बॉलिंगने विरोधी टीमच्या नाकात दम आणणाऱ्या मोहम्मद शमीने 2014 साली हसीन जहांसोबत लग्न केलं. लग्नाआधी कलकत्त्याची असणारी हसीन मॉडेलिंग करायची.

आरती अहलावत-
विरु पाजी मजा घेण्याच्या बाबतीत आपल्या बायकोला सुद्धा सोडत नाहीत. वीरेंद्र सेहवागची बायको आरती पहिले पीआर (पब्लिक रिलेशन्स) प्रोफेशनल होती.

विजेता पेंढारकर-
भारतीय टीमचा ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणाऱ्या राहुल द्रविडच्या पत्नीला खेळात फारशी आवड नाहीये. विजेता नागपूरची असून ती एक सर्जन आहे.

अंजली तेंदुलकर-
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली चांगल्या आणि वाईट प्रसंगी नेहमी त्याच्यासोबत असते. अंजली पेशाने डॉक्टर आहे, त्या बाल-रोग तज्ञ आहेत.

हेजल कीच-
भारतीय टीमचा स्टार ऑलराउंडर युवराज सिंगने हेजल कीच सोबत 30 नोव्हेंबर 2016 साली लग्न केलं. हेजल कीच एक ब्रिटिश मॉडल असून तिने काही सिरियल्स आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

गीता बसरा-
भारतीय क्रिकेट टीमचा यशस्वी ऑफ स्पिनर हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांनी 2015 मध्ये लग्न केलं. गीताने ‘द ट्रेन’ आणि ‘जिला गाजियाबाद या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Loading...

LEAVE A REPLY