सिनेमाचं शूटिंग पूर्ण होण्याअगोदरच, मराठीतील ‘या’ नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू !

मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या एका नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू झाला आहे. गुरूवारी पहाटे तिच्या कारला अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याची ही घटना लातूरमध्ये घडली. अस्मिता मोरे असे या नायिकेचे नाव आहे. अवघे 15 दिवस शूटिंगचे झाले असतानाच हा अपघात घडला आहे. यामुळे चित्रपटाने सहकारी मंडळींनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.

निलंगा तालुक्यातील सावरी या गावात अस्मिताच्या ‘पेटलं मन सारं’ या मराठी चित्रपटाचे चित्रिकरण मागील १५ दिवसांपासून सुरू होते. याच चित्रपटाचे शूटिंग करून अस्मिता तिच्या भावासह निलंगा या ठिकाणी जात होती. यावेळी अस्मिताच्या कारचे टायर फुटून कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळली व यात अस्मिताचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत कारचालक व अस्मिताचा भाऊ सुदर्शन कदम हे एअर बॅगमुळे बचावले. अस्मिता च्या पार्थिवावर आज दुपारी कर्नाटकातील भालकी जवळच्या अहमदाबाद येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे तिच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. दहावी परीक्षेत तिने इंग्रजी विषयात 100पैकी तब्बल 99 गुण घेतले होते.ती बारावीत शिकत होती.भालकी जवळील अहमदाबादची ती मूळ रहीवाशी आहे.तिचे वडील निलंगा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.अस्मिता च्या अशा अकाली जाणे मनाला चटका लावणारे ठरले असून लातूर व परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अगोदरही अनेक मराठी कलाकारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यामध्ये आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा देखील समावेश आहे. आपल्या सिनेमातील शूटिंगवरून परतत असताना हा अपघाती मृत्यू झाला होता.
सौजन्य

Loading...

LEAVE A REPLY