अशी सुरु करा स्वतची गॅस एजन्सी आणि मिळवा लाखो रुपये…

तेल कंपन्या लवकरच देशभरात 6500 नवे डिस्ट्रिब्युटर सेंटर सुरु करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता नवी गॅस एजन्सी सुरु करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत केंद्र सरकारने 2018-19 पर्यंत 5 कोटी नवे एलपीजी कनेक्शन दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना देण्याचं लक्षं ठरवलं आहे.

http://im.hunt.in/cg/panipat/City-Guide/gas-2.jpg
सरकारने काही दिवसांपूर्वीच डिस्ट्रिब्युटर बनण्यासाठी असलेल्या नियमांत बदल करत सूट दिली आहे. त्यामुळे डिस्ट्रिब्युटर बनण्यासाठी आता एकदम सोपी आणि सहज पद्धत उपलब्ध झाली आहे. येत्या काळात महाराष्ट्रात तब्बल 400 नव्या गॅस एजन्सी सुरु केल्या जाणार आहेत.
http://im.hunt.in/cg/udaipur/City-Guide/Gas_Agencies_in_Udaipur.jpg

गॅस एजन्सी किंवा डिलरशिप घेण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे कायमचा निवासी पत्ता (परमनंट अॅड्रेस) आणि जमिनीची आवश्यकता असते. अर्ज करणा-या व्यक्तीकडे कायमचा निवासी पत्ता असणं गरजेचं आहे. तसेच गॅस एजन्सी, ऑफीस आणि गोदाम सुरु करण्यासाठी आवश्यक जागाही असणं गरजेचं आहे. जमिन कुठल्या परिसरात, वॉर्डात असायला हवी यासंदर्भातील माहिती जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केली जाते.
https://www.expatads.com/adpics1/2014/12/23/Commercial-Space-for-rent-in-Philippines-Sorsogon-City-Barangay-Balogo-5498bdc5e4708a67897f.jpg
यासर्व गोष्टींसोबतच तुमच्याकडे काही ठराविक बँक बॅलंस आणि डिपॉझिट रक्कमही असणं गरजेचं आहे.
अनुसुचित जाती आणि जमातीच्या नागरिकांसाठी तसेच सामाजिक स्वरुपात अक्षम असलेल्या नागरिकांसाठी, माजी सैनिक, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले नागरिक, पोलीस, सरकारी कर्मचारी या सर्वांसाठी गॅस एजन्सी खरेदीसाठी आरक्षण दिलं जातं.
https://image.delfoo.com/delfoo/vendor/logo/maji-sainik.jpg

एजन्सी खरेदीसाठी शैक्षणिक पात्रतेत सूट
https://www.franchiseindia.com/uploads/content/edu/art/education-858cc07046.jpg

जनरल किंवा रेग्युलर कॅटेगरीतील एलपीजी एजन्सी खरेदी करण्यासाठी शैक्षणिक पात्रता यापूर्वी पदवी होती. मात्र, आता शैक्षणिक पात्रता कमी केली असून आता 10वी पास असलेला व्यक्तीही एलपीजी एजन्सीसाठी अर्ज करु शकणार आहे. यामुळे कमी शिक्षण झालेली व्यक्तीही आता एलपीजी डिलरशिप खरेदी करु शकणार आहेत.
एजन्सी खरेदीसाठी वयामध्ये सूट
यापूर्वी एलपीजी डिस्ट्रिब्यूटरशिप खरेदीसाठी वयाची मर्यादा ही 21 ते 45 वर्षांपर्यंतची होती. मात्र, आता नव्या गाईडलाइन्सनुसार, 60 वर्षांपर्यंतची व्यक्ती डिस्ट्रिब्यूटरशिपसाठी अर्ज करु शकतील.
नव्या नियमांनुसार, डिलरशिप सुरु करण्यासाठी फायनान्सची असलेली अट रद्द करण्यात आली आहे. तसेच सिक्युरिटी डिपॉझिटमध्येही कमी करण्यात आली आहे. यावरुन स्पष्ट आहे की, जर तुमच्याकडे कमी पैसे असले तर तुम्हीही गॅस एजन्सी खरेदी करु शकाल.

पाहा कुठल्या राज्यात किती सुरु होणार नव्या एजन्सी

महाराष्ट्र – 400
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे , सध्या २०१७ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. हे जिल्हे दर्शविलेल्या सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.
उत्तर प्रदेश – 1000

पश्चिम बंगाल – 650

नॉर्थ ईस्ट – 200

केरळ – 80

आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा – 200

दिलेल्या नकाशामध्ये जिल्ह्याची संख्या आहे जिथे तुम्ही एजेन्सी सुरु करू शकता.. माहिती आवडली असेल तर नक्की गरजुसाठी शेअर करा ..

Loading...

LEAVE A REPLY