मला त्या इमेजचा पश्चात्ताप होत नसून, स्वत:वर गर्व वाटतो : सनी लेओनी ..

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सनी लिओनीने स्पष्ट केले होते की, ती इमेज बदलण्यासाठी साउथ इंडस्ट्रीत जाणार आहे. त्यामुळे सनी लिओनीला पोर्न स्टार इमेज असल्याचा पश्चात्ताप होत असल्याची चर्चा लोकांमध्ये रंगली होती. परंतु आता सनीने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सनीने म्हटले की, काही लोकांच्या मते मी जुनी इमेज (पोर्न स्टार) बदलण्यासाठी साउथकडे वाटचाल करीत आहे.परंतु अशा लोकांना मी सांगू इच्छिते की, असे काहीही नाही. उलट मला त्या इमेजचा पश्चात्ताप होत नसून, स्वत:वर गर्व वाटतो.’दरम्यान, सनीला साउथमधील एक मोठा चित्रपट मिळाला असून, तिची साउथमध्ये दणक्यात एंट्री होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत सनीने पाच तेलगू, कन्नड आणि तामीळ गाण्यांमध्ये कॅमिओ केला आहे. आता तिला एक मोठा चित्रपटच मिळाल्याने ती मुख्य भूमिकेत चित्रपटात काम करताना बघावयास मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजला जात आहे. याविषयीची माहिती स्वत: सनीनेच सोशल मीडियावर दिली असून, त्याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे.सनीने साउथचा जो प्रोजेक्ट साइन केला आहे तो एक पीरियड वार चित्रपट आहे.

हा चित्रपट तेलगू व्यतिरिक्त तामीळ, मल्याळम आणि हिंंदीमध्येही बनविला जाणार आहे.या चित्रपटाची वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये सनी एका फायटरच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे.चित्रपटात सनी घोडेस्वारी, तलवारबाजी करताना दिसणार आहे. थोडक्यात सनी चित्रपटाच्या एका यौद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याकरिता ती एक स्पेशल ट्रेनिंगही घेत आहे.त्यामुळे या चित्रपटातून तिची इमेज बदलेल अशी शक्यता वर्तविली जात असली तरी, सनीला तिच्या जुन्या इमेजचा अजिबातच पश्चात्ताप होत नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

Loading...

प्रतिक्रिया द्या