चंद्राला मामा का म्हणतात…भाऊबीजेत लपली आहे गोष्ट.. अवश्य वाचा..

mingblogging.files.wordpress.com

भावा- बहिणीच्या प्रेमळ नात्यात भाऊबीजेला विशेष महत्त्व आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी ओवाळून घेण्यासाठी जात असतो. याच दिवशी भावाने बहिणीकडे जाण्याची ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. भावा बहिणीच्या नात्यात या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

http://bollywoodhelpline.com

पूर्वापार चालत आलेल्या या सणाच्या कथेनुसार या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे ओवळणीसाठी जातो त्याला यमाचं भय राहत नाही तसेच त्याला दीर्घायुष्य देखील लाभतं असं म्हंटलं जातं.
आज आम्ही तुम्हाला आणखीण एक गोष्ट सांगणार आहोत जी तुम्ही तुमच्या आईच्या तोंडातून अनेकदा ऐकली तर असेल मात्र तिलाही तिच्या या बोलण्यामागचं खरं कारण माहीत नसावं. चांदोमामाबद्दल आपण लहानपणी अनेकदा ऐकलं असेल. लहानपणी आईकडून आपल्या लाडक्या चांदोमामाच्या गोष्टी ऐकता ऐकता अनेकदा आपण गाढ झोपले जायचो. मात्र चंद्राला मामा बोलण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली, कोणी सुरू केली याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती नसेल.

youtube.com

तर मग चंद्राला मामा म्हणायची गोष्ट अशी आहे-
भाऊबीजेच्या दिवशी बहिणीपासून लांब राहणाऱ्या भावाला काही कारणास्तव जेव्हा बहिणीकडे ओवाळायला जाता येत नव्हतं. तेव्हा बहीण चंद्रालाच आपला भाऊ मानून त्याला ओवाळत असे आणि आपल्या मुलांसमोर चंद्राला उद्देशुन मामा म्हणत असे. तेव्हापासून चंद्राला मामा म्हणण्याची प्रथा सुरू झाली.

http://timesofhindu.com

भाऊबीजेच्या दिवशी सगळ्या भावांनी आपल्या विवाहीत बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी जावूनच भेटावे. ज्या पद्धतीने रक्षाबंधनाच्या वेळी बहिणी आपल्या माहेरी येतात. त्याचप्रमाणे बहिणींनी भाऊबीजेला आपल्या भावाला आपल्या सासरी बोलावून त्याची ओवाळणी करावी.

mingblogging.files.wordpress.com

तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खुप शुभेच्छा.. सगळ्या भावा- बहिणीचं प्रेम आयुष्यभर असंच टिकून राहो हीच आमच्यावतीने ईश्वरचरणी प्रार्थना..

Loading...

LEAVE A REPLY