गुळ खाण्याचे हे आहेत ९ फायदे

Unbelievable BEnefits of eating jaggery

गुळ केवळ खाद्य पदार्थ किंवा सारखेचा पर्याय नाहीये तर एक अ‍ॅंटी टॉक्सिन म्हणूनही काम करतं. गुळ खाल्ल्याने आपल्या शरिरातील रक्तातील हानिकारक टॉक्सिनला बाहेर काढून त्वचेची सफाई करण्यात मदत करतो. त्यामुळे गुळाचे नियमीत सेवन केल्याने पिंपल्सची समस्याही दूर होते.जाणकार डॉ.नीतीशचंद दुबे सांगतात की, आपल्या त्वचेच्या काळजीसाठी लोक सौंदर्य प्रसाधनांवर वारेमाप खर्च करतात. त्याऎवजी जर गुळाचा वापर केला तर अधिक फायदा होऊ शकतो. त्वचेसोबतच गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

१) पिंपल्सची समस्या सामान्य आहे. खाण्यात जास्त तेल-मसाल्यांचा उपयोगामुळे किंवा धुळीमुळे पिंपल्स येतात. जर रोज थोडा थोडा गुळ खाल्ला तर ही समस्या दूर होऊ शकते.गुळामध्ये आयर्नचा समावेश असतो. त्यामुळे सकाळी-सकाळी पाण्यासोबत याचं सेवन केल्यास एनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो. जर तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल, तेव्हाही गुळ खाणे अधिक फायदेशीर असू शकतं. थकवा जाणवल्यास थोडा गुळ पाण्यासोबत घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल.गुळ गॅस आणि पचनाशी संबंधीत समस्याही दूर करतो. जेवण केल्यानंतर थोडा गुळ खावा त्याने पचनही चांगलं होतं आणि गॅसची समस्याही दूर होते. दम्याचा त्रास होत असला तरी गुळामुळे फायदा होतो. गुळामध्ये अ‍ॅंटी अ‍ॅलर्जिक तत्व असतात जे दम्याला आराम देतात. यामुळे शरिरातील तापमानही नियंत्रीत राहतं.

श्वासासंबंधी काही त्रास असेल तर त्यावरही गुळ फायदेशीर होऊ शकतो. पाच ग्रॅम गुळ तितक्याच सरसो तेलात मिसळून खावे, त्याने श्वासाशी निगडीत समस्या दूर होईल.घसा बसलावरही गुळाने आराम मिळतो. घसा बसल्यास शिजलेल्या भातासोबत गुळाचे सेवन करावे. इतकेच काय तर कान दुखत असेल तर त्यावरही उपाय म्हणून गुळ वापरता येतो. गुळाला तुपासोबत मिसळून खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल.

Loading...

प्रतिक्रिया द्या