​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक !

​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळा ठरु शकतो घातक !

हिवाळा आरोग्यमय म्हटला जातो. या ऋतूत विशेष काळजी घेतल्यास आपले आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते. मात्र दुर्लक्ष केल्यास आरोग्यासाठी घातकही ठरु शकतो. कारण हा संक्रमण काळ असतो, त्यामुळे सर्दी, खोकला असे आजार यावेळी होण्याची शक्यात वाढते, जी मोठ्या आजाराची सुरुवात असते. त्यामुळे ऋतू बदल होत असताना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे जरुरी असते. तुम्हालाही या बदलत्या वातावरणात जर आजारांपासून लांब रहायचे आहे तर या ५ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये.

* आहाराचे पथ्य
थंडीमध्ये गरम आणि हलके जेवण करा. बदलत्या वातावरणामध्ये गरम आणि हलके जेवण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यासोबत थंड पेय, पदार्थ खाणे टाळा. याने आपल्या शरीरची पचनक्रियेची गती मंदावते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. आपल्या आहारात अश्वगंधा, आवळा, तुळस, त्रिफळा, चवनप्राश, इत्यादी औषधी वनस्पतींचा समावेश करा.

Food with unsaturated fats
Food with unsaturated fats
या औषधी वनस्पती आपल्या शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.
* मालिशचा वापर
आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीराची तेलाने मालिश करा.
http://women.informationng.com/wp-content/uploads/2016/12/oilmassagemain1_main.jpg
यासाठी तिळाचे किंवा सूर्यफूलाचे गरम तेलाचा वापर करा. त्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरण नियमित होते.
http://www.congressdb.com/file/2017/04/960×0.jpg

* पुरेशी झोप
आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे नियमित झोप.
Handsome man sleeping in his bedroom. Man sleeping with alarm clock in foreground. Serene latin man sleeping peacefully.
थंडीच्या ऋतुत पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. याने शरीराला ताकद मिळते आणि आपण दिवसभर टवटवीत राहतो.
* व्यायामात सातत्य
थंडीमध्ये व्यायाम केल्याने इतर ऋतुच्या तुलनेत अधिक फायदा होतो. या काळात जास्त उर्जा खर्च होत असल्याने तुम्हाला छान भूक लागते. परिणामी तुमचे वजन वाढण्यास मदत होते. थंडीत घाम येत नसल्याने शरीरातील उत्सर्जन काही प्रमाणात कमी झालेले असते, त्याची कमतरता व्यायाम केल्याने भरुन निघते.
* नियमित आंघोळ
सकाळी थंडी वाजत असल्याने बऱ्याचवेळा आपण आंघोळ टाळतो. मात्र तसे करणे चुकीचे आहे. शरीराची मस्त मालिश केल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा. गरम पाण्याने अंघोळ करताना पाण्यात मीठ, इलायची, तुळस किंवा मग कडुनिंबाची पाने पाण्यात टाका. त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो.

Loading...

NO COMMENTS

LEAVE A REPLY