खाण्यावरही फार नियंत्रण न ठेवताही पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स..

आपण स्वतला नीटनेटके ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण आपलं वाढलेलं पोट त्यावर एक ठप्पाचं आहे. आपण दररोजच्या कामामुळे व्यस्त असतो. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. खाण्यावरही फार नियंत्रण ठेवता येत नाही. मग पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स –
बसण्याच्या पद्धती

आपली बसण्याची अयोग्य पद्धत आपल्या पोटाची चरबी वाढण्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं. खासकरून ज्या व्यक्ती जास्त वेळ कंम्प्युटरच्या समोर बसतात, त्यांच्या पद्धतीमुळे पोटातील स्नायू बाहेर येण्यास सुरुवात होते आणि त्याने पोट बाहेर यायला सुरुवात होते. जास्तीत जास्त वेळ सरळ बसण्याचा प्रयत्न करा, पण त्याने जर तुमच्या पाठीला त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पाठीमागे उशी ठेवून बसा.

खाण्याची वेळ

नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मधील वेळ महत्त्वाचा आहे. उठल्यानंतर 2 तासानंतर नाश्ता करा. नाश्ता अगदी पोट भरून करा. त्यानंतर 4 किंवा 5 तासानंतर जेवण करा. जेवणमात्र जरा हलके करा पण पोषक आणि फायबरयुक्त पदार्थ खावेत.

सफेद मीठ आणि साखर खाणे टाळा

जेवणात जाड्या मीठाचा वापर वाढवा, शक्यतो सफेद मीठ खाणे बंद करा. जाड्या मीठामुळे आपली चरबी कमी होण्यास मदत होते. साखरेचा वापर कमी करा, साखरेऐवजी गूळ, मध किंवा खजूर याचा वापर खाण्यात करू शकता.

डाएटमध्ये फायबर पदार्थ खा

आपल्या रोजच्या आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. याने खाल्लेलं पचायला मदत होते. पोटाचे आजार टाळतात आणि वाढत्या चरबीवर नियंत्रण राहते. विटॅमिन सी असलेली फळं आणि भाज्या खा, ज्याने शरीरातील लोहयुक्त पदार्थांचे पचन होण्यास मदत होते.

Loading...

LEAVE A REPLY