हिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..

हिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य…जाणून घ्या कसे ते ..

हिवाळ्यात कॉफी वाढवेल तुमचे सौंदर्य
हिवाळ्यात वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन थंडीचा आनंद लुटणे प्रत्येकालाच आवडते. कॉफी पिणे शरीरासाठी फारसे उपयोगी नसते, असे बरेच म्हटले जात असले तरी कॉफीचा मोह आवरणे कठीण आहे. परंतु हीच कॉफी तुमच्या सौंदर्यात भर पाडण्यास मदत करू शकते.
एवॉन इंडियाच्या प्रशिक्षण प्रमुख नीतू पाराशर यांनी कॉफीचे सौंदर्यविषयक फायदे सांगितले आहेत.
१. बियांच्या स्वरूपात कॉफीचे केलेले सेवन तुमच्या त्वचेवर तजेला आणण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. यामधील कॅफिन त्वचेला यूव्ही किरणांच्या वाईट प्रभावापासून दूर ठेवते.
२. मृत त्वचा काढणे व कांती उजळवणे या गुणांमुळे कॉफी अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये घटक पदार्थ म्हणून वापरली जाते.
३. कॉफीच्या बिया वाटून घरगुती बॉडी स्क्रब बनवला जातो. कॉफी पीच किंवा अक्रोडपेक्षा सौम्य असल्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा काढताना मूळ त्वचेवर ओरखडे पडत नाहीत.

Ground coffee and beans.

४. सूजलेले डोळे किंवा डोळ्याखालील काळे वर्तुळ कॉफीच्या मदतीने सहज कमी करता येतात. कॉफीच्या आईस क्यूबने डोळ्याला सावकाश मसाज केल्यास या समस्या दूर होतात.

Loading...

NO COMMENTS

LEAVE A REPLY