खजूर खाण्याचे फायदे जाणून घ्या!

benefits-of-eating-dates-are-useful-for-good-skin-and-hairs

खजूर आरोग्यासाठी चांगला असतो. दिवसातून किमान चार खजूर खावेत, असे कुणी, कधीतरी आपल्याला सांगितलं आहे. पण खजूर खाण्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत आपल्याला माहिती असते असं नाही. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर खाणे चांगले असते किंवा आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणूनही दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा, असे घरातील व्यक्तींकडून सांगितलं जातं. पण आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. खजुरामध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्व असते. ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. याशिवाय खनिज, ऊर्जा मिळण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. मात्र खजुराचे असेही काही फायदे आहेत जे आपल्याला माहिती नसतात. खजुरामुळे त्वचा नितळ आणि केस मजबूत होण्यास मदत होते. जाणून घ्या, फायदे…

१. त्वचा नितळ राहण्यास मदत दैनंदिन आहारात खजुराचा समावेश केल्यास त्वचा नितळ होते. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत. चेहऱ्यावरील ताण आणि अकाली आलेले वृद्धत्व लपविण्याचे काम खजुरामुळे होते. तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसता.चेहऱ्यावरील चट्ट्यांसाठी उपाय काहींच्या चेहऱ्यावर डाग किंवा चट्टे असतात. खजुरामध्ये असणाऱ्या ब जीवनसत्वामुळे चेहऱ्यावरील चट्टे कमी होण्यास मदत होते. खजूर खाण्याबरोबरच खजूर आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने हे डाग कमी होण्यास मदत होते.

तजेलदार त्वचा दररोज खजुराचं सेवन केल्याने त्वचा तजेलदार होते.केसांचा पोत सुधारण्यास मदत खजुरामध्ये असणारे ब जीवनसत्व आणि लोह याचा केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. खजुराचे तेल लावल्यास केस जाड आणि लांब होतात.केस गळण्यावरील उत्तम उपाय केस गळणे ही समस्या पूर्वी केवळ वयस्कर लोकांमध्येच दिसून येत होती. मात्र आता सर्वच वयोगटातील लोकांना ही समस्या जाणवते. खजुरामधील घटक ही समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा.

Loading...

प्रतिक्रिया द्या